आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: इंडियन क्रिकेटच्या इतिहासातील काही AMAZING MOMENTS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एप्रिल 2011 चा भारताने दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकला तो क्षण. हा क्षण खास होता याचे कारण म्हणजे WC जिंकणे हे सचिनचे स्वप्न होते. त्यासाठी संपूर्ण टीमने प्रयत्न केले होते. - Divya Marathi
एप्रिल 2011 चा भारताने दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकला तो क्षण. हा क्षण खास होता याचे कारण म्हणजे WC जिंकणे हे सचिनचे स्वप्न होते. त्यासाठी संपूर्ण टीमने प्रयत्न केले होते.

स्पोर्ट्स डेस्क - भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असतानाच आयपीएलच्या 11 व्या सीझनचा शेड्युल जारी झाला आहे. सध्या सुरू असलेल्या दुहेरी वनडे मालिकेत 5 पैकी 4 सामने भारताने जिंकून मालिका काबिज केली. आता 6 वा आणि शेवटचा सामना फक्त औपचारिकता ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर Divyamarathi.com आपल्यासाठी टीम इंडियाचे काही दुर्मिळ क्षण फोटोंमधून घेऊ आला आहे.

 

क्रिकेटच्या दुनियेत भारताला सर्वोच्च स्थानी पोहोचवण्यात आतापर्यंत अनेक दिग्गज खेळाडूंचे योगदान दिले आहे. मात्र यात आघाडीवर आहे सचिन तेंडूलकर. सचिनने अत्यंत कमी वयात क्रिकेटमध्ये पदार्पण करून अक्रामक खेळीने संपूर्ण जगाला वेड लावले. सचिन जेव्हा बॅटींगसाठी मैदानात असायचा तेव्हा दुसऱ्या बाजूने खेळत असलेल्या संघाचे खेळाडू आधीच दबावात असायचे. सचिनने 200 व्या कसोटीनंतर भारतीय क्रिकेटमधून सन्यास घेतला तेव्हा संपूर्ण जगातील क्रिकेटप्रेमींच्या हृदयाचा ठोका चुकला होता. हे HISTORICAL फोटो पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर शहारा आला नाही तर नवलच...

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, क्रिकेटच्या इतिहासातील असेच काही PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...