आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IPL मॅचमध्ये बॉलरने केले असे काही, 'गब्बर'च्या पत्नीने लपविला चेहरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - आयपीएल 2018 च्या 23 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सला 31 धावांनी पराभूत केले. मुंबई इंडियन्सला हैदराबादने विजयासाठी फक्त 119 धावांचे आव्हान दिले होते. हैदराबादकडून ओपनर शिखर धवन उर्फ गब्बर काही चांगले परफॉर्म करू शकला नाही. तो केवळ 5 धावांवरच बाद झाला. मॅच पाहण्यासाठी गब्बरची पत्नी आयशा धवन सुद्धा उपस्थित होती. मॅच दरम्यान हा मोमेंट असा होता की आयशाने आपला चेहराच लपविला. 


- मॅचमध्ये असाही एक क्षण आला जेव्हा आयशा धवनला आपल्या हातांनी चेहरा लपवावा लागला. हा मोमेंट टॉस हारल्यानंतर बॅटिंगवर उतरलेल्या सनराझर्सच्या इनिंगच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये टिपला आहे. 
- मिशेल मॅक्लिंघनचा चेंडू धवनच्या बॅट आणि पायाला लागून थेट स्टम्पवर गेला. यानंतर शिखर धवनला तंबूत परतावे लागले. 
- धवन 6 बॉलमध्ये फक्त 5 धावा काढून बाद झाला. आपला पती आऊट झाल्याचे पाहून स्टेडिअममध्ये बसलेली आयशा धवनने आपल्या हातांनी चेहरा लपविला. 


मॅच समरीः
सनरायझर्स हैदराबाद- 118 ऑलआउट (18.4 ओव्हर) (विल्मसन- 29, पठाण- 29)
मुंबई इंडियन्स- 87 ऑलआउट (18.5 ओवर) (सूर्यकुमार- 34, कृणाल- 24)
सामनावीर - राशिद खान (11 धावा देत 2 विकेट)


पुढील स्लाइड्सवर पाहा, या मोमेंटचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...