आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

याला म्हणतात आयपीएलचे बेस्ट कॅच, फॅनला आठवली चमत्कार चित्रपटातील मॅच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - आयपीएल 2018 चा 19 वा सामना आरसीबी आणि डीडी यांच्यात खेळला गेला. यात बेंगलुरूने दिल्लीला 6 गडींनी पराभूत केले. मॅचमध्ये बेंगलुरुचा कर्णधार विराट कोहली फक्त 30 धावा काढू शकला. ट्रेन्ट बोल्टने झेल घेऊन विराटची इनिंग संपवली. बोल्टने घेतलेला कॅच आयपीएलचा आतापर्यंतचा बेस्ट कॅच मानला जात आहे. कॅच पाहून सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरू झाली. एका फॅनला हा झेल पाहून शाहरुखचा चित्रपट चमत्कारमधील क्रिकेट मॅचचा सीन आठवला. 

 

- मॅचमध्ये विराट 11 व्या ओव्हरचा शेवटचा चेंडू खेळत होता. हर्षल पटेलच्या याच बॉलमध्ये बोल्टने विराटचा झेल घेतला. 
- विराटने लावलेला शॉट थेट बाउंड्रीच्या दिशेने जात होता. त्याचवेळी बाउंड्रीवर उभा असलेला बोल्ट याने हवेत उंच झेप घेत कॅच केला. 
- कॅच घेतल्यानंतर तो जागेवरच पडला. सर्वांना वाटले की तो बाउंड्रीवर पडला असेल. तरीही बोल्टने उठून सेलिब्रेशन सुरू केले. प्रकरण थर्ड अंपायरकडे गेले. टीव्हीवर रिप्लेमध्ये स्पष्ट झाले की बोल्ट पडला होता, पण त्याने बाउंड्रीला टच केले नव्हते. 

 

मॅच समरी
दिल्ली डेअरडेव्हिल्स- 174/5 (20 ओव्हर) (ऋषभ पंत- 85, श्रेयस अय्यर- 52)
रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु- 176/4 (18 ओव्हर) (एबीडी- 90* रन)

 

पुढील स्लाइड्सवर, वाचा अशाच आणखी काही प्रतिक्रिया...

बातम्या आणखी आहेत...