आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कभी खुशी कभी गम' आयपीएलमध्ये अशा बदलत गेले रितिकाचे एक्सप्रेशन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - IPL 2018 च्या 37 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइटरायडर्सला 13 धावांनी पराभूत केले. मॅचमध्ये कोलकाताला विजयासाठी 182 धावांचे टार्गेट मिळाले होते. पण, कोलकाताचा संघ फक्त 168 धावा करू शकला. केकेआरकडून रॉबिन उथप्पाने सर्वाधिक 54 धावा काढल्या. पण, त्याची बॅटिंग टीमला विजयी करू शकली नाही. सामना पाहण्यासाठी स्टेडिअमवर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सुद्धा उपस्थित होती. मॅचच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक मोमेंटला तिच्या बदलत्या एक्सप्रेशन्सने सर्वांचे लक्ष वेधले. 


- कोलकाताची बॅटिंग सुरू असताना रॉबिन उथप्पा बॅटिंगवर होता. तसेच मयंक मार्कंडेयच्या 13 व्या ओव्हरमध्ये त्याने लाँग शॉट खेळला. 
- उथप्पाने शॉट बॉलवर लाँग शॉट खेळल्याने लाँग ऑफवर फील्डिंग करणाऱ्या बेन कटिंगकडे बॉल गेला. त्याने उथप्पाचा झेल घेत त्याला बाद केले. 
- यावेळी जेव्हा उथप्पाने शॉट खेळला तेव्हा रितिकाने अतिशय गंभीर एक्सप्रेशन दिले. हा षटकार किंवा चौकार नक्कीच असेल असे तिला वाटले. त्यामुळे ती निराश झाली होती.
- पण, दुसऱ्याच क्षणी तिला बेन कटिंगच्या हातात झेल दिसला. तेव्हा अचानक तिच्या चेहऱ्यावर हसू फुलले. 
- विशेष म्हणजे, उथप्पा जेव्हा 4 धावांवर होता, तेव्हा मयंकने त्याची कॅच सोडली होती. त्यावेळी मयंकने लाइफलाइन दिली नसती तर मॅच लवकर संपली असती. 
 

मॅच समरीः
मुंबई इंडियन्स- 181/4 (20 ओव्हर) (सूर्यकुमार- 59, लुईस- 43)
कोलकाता नाइटरायडर्स- 168/6 (20 ओव्हर) (उथप्पा- 54, कार्तिक- 36*)
MoM- हार्दिक पंड्या (35* रन आणि 2 विकेट)


पुढील स्लाइड्सवर, या मोमेंट्सचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...