आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनची LOVE STORY: अंजलीनेच केला होता प्रपोझ, अशी आहे लग्नाची गोष्ट...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - सध्या व्हॅलेन्टाइन वीक सुरू आहे. प्रेमवीरांच्या या आठवड्यात आम्ही क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि अंजलीची प्रेम कहाणी घेऊन आलो आहे.  सचिनने आपल्या फलंदाजीने क्रिकेट रसिकांना अक्षरश: वेड लावले होते. शिवाय या विशेष पॅकेजमधून सचिनच्‍या लग्‍नाचे दुर्मिळ फोटोजही आम्‍ही तुम्‍हाला दाखवणार आहोत.

 

पत्रकार म्हणून भेटली होती अंजली
पहिल्याच नजरेत अंजली सचिनवर भाळली होती. सचिनला भेटण्‍यासाठी अंजली पत्रकार म्‍हणून त्याच्या घरी गेली होती. तेव्‍हा सचिनच्‍या आईने तिला ‘तू खरोखर पत्रकार आहेस का? असा प्रश्‍न केला होता. तेव्‍हा अंजलीची भंबेरीही उडाली होती. याशिवाय अंजलीने सचिनला 'चॉकलेट' गिफ्ट केल्यानंतर आईच्या सर्व प्रकार लक्षात आला होता. पण तिने फक्त स्मित हास्य करून अंजलीला सून म्हणून स्वीकारले होते, असा खुलासा एकदा खुद्द सचिनने केला होता.

 

सचिन तेंडुलकरने ‘प्लेइंग इट माय वे’ या आत्मचरित्रातून क्रिकेट आणि आपल्या खाजगी आयुष्यातील गोष्टींना उजाळा दिला आहे. त्यात त्याने आपल्या लव्ह लाईफचे वर्णन केले आहे. क्रिकेटचा महानायक, मास्‍टर ब्‍लॉस्‍टर सचिन तेंडुलकरलाही पहिल्‍याच नजरेत प्रेम जडले होते. भलेही अंजली सचिनपेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे.

 

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून वाचा, अंजली आणि सचिनची लव्ह लाईफ... आणि पाहा दुर्मिळ फोटोज....

बातम्या आणखी आहेत...