आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्पोर्ट्स डेस्क - अमेरिकेतील फेमस 'टाइम' मॅगझीनने यावर्षीच्या जगातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींची यादी जारी केली. स्पोर्ट्स जगतातील फक्त 6 जणांचा समावेश असलेल्या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे नाव आहे. टाइमच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत नाव चमकवणारा विराट केवळ भारतातच नव्हे, तर जगातील एकमेव क्रिकेटर आहे. त्यातही महत्वाचे म्हणजे, लिस्टमध्ये ज्या 100 दिग्गजांची नावे आहेत त्यांची प्रोफाइल त्याच फील्डच्या दिग्गजांनी लिहिली आहे. त्यामध्ये विराटची प्रोफाइल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने लिहिली.
- सचिने विराटबद्दल लिहिले, 'जिद्दी क्रिकेटर विराटला पहिल्यांदा अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप खेळताना पाहिले होते. तो त्यावेळी कॅप्टनशिप करत होता.'
- 'आज विराट प्रत्येक घरात फेमस आणि क्रिकेटमध्ये चॅम्पियन आहे. त्यावेळी धावांबद्दल विराटची भूक होती, ती आजही कायम आहे. सतत चांगले परफॉर्म करणे त्याची क्षमता होती. हीच क्षमता आता त्याची ओळख बनली आहे.'
- सचिनने पुढे लिहिले, 'कोहली आपल्या टीकाकारांचा सामना ज्या आत्मविश्वासाने करतो ते खरोखर कौतुकास्पद आहे. माझे वडील म्हणायचे, तुम्ही जे काही करत आहात ते पूर्ण मन लावून करावे. कालांतराने तुमचे लक्ष विचलित करणारे सुद्धा तुमचे फॅन्स होतील. विराटमध्ये मला हाच दृष्टीकोन दिसून येतो.'
- 'विराटने वेस्ट इंडीज सीरीझमध्ये निराशाजनक प्रदर्शन केले. टीका होत असतानाही त्याने अतिशय सकारात्मक पद्धतीने त्यांना उत्तर दिले. परतल्यानंतर त्याने आपले लक्ष्य निर्धारित केले, टेकनीकसह फिटनेसवर लक्ष दिले. त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही.
विराट म्हणाला, थँक यू
सचिनने प्रोफाइल लिहिल्याचे वाचल्यानंतर विराटने आपल्या आवडत्या क्रिकेटरला धन्यवाद म्हटले आहे. त्याने ट्वीट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
या भारतीयांचा देखील समावेश
- टाइम मॅगझीनच्या यादीत भारतातून विराट कोहली व्यतिरिक्त अॅक्ट्रेस दीपिका पादुकोण आणि कॅब सर्व्हिस देणारी कंपनी ओलाचे भाविश अग्रवाल यांचाही समावेश आहे.
- लिस्टमध्ये ज्या 6 खेळाडूंची नावे आहेत त्यामध्ये विराट दुसऱ्या आणि पहिल्या क्रमांकावर स्वित्झरलंडचा टेनिस स्टार रॉजर फेडरर आहे.
पुढील स्लाइडवर, विराटने दिलेली प्रतिक्रिया...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.