आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पोर्ट्स डेस्क - पाकिस्तानचा माजी स्फोटक फलंदाज शाहिद आफ्रिदी आजही जगात सिक्सर्सचा बादशहा म्हणून ओळखल्या जातो. क्रिकेट सोडल्यानंतर तो सध्या आपल्या एनजीओमार्फत समाजसेवा करत आहे. एक काळ असा होता की केवळ पाकिस्तानीच नव्हे, तर भारतासह अनेक देशांच्या तरुणी आफ्रिदीवर फिदा होत्या. तो अनेकींच्या कल्पनेतील राजकुमार होता. हजारो-लाखो फीमेल फॉलोअर्स असतानाही पाकिस्तानच्या सर्वात लोकप्रिय फलंदाजाचा विवाह त्याच्या मामाच्या मुलीशी झाला आहे.
टीचरच्या प्रेमात पडला होता
>> एकदा शाहिद आफ्रिदीने स्वतःच खुलासा केला होता की, तो शाळेत शिकत असतानाच प्रेमात पडला होता.
>> तो जिच्या प्रेमात पडला ती कुणी दुसरी-तिसरी नसून खुद्द त्यला शिकवणारीच एक शिक्षिका होती.
>> त्याने गमतीने असेही सांगितले होते की, ते लहानपण होते. तेव्हा मी केवळ 9 वर्षांचा होतो. मी टीचरच्याच प्रेमात पडलो होतो. ती फार सुंदर होती.
मामाच्या मुलीशी झाले लग्न
>> शाहिद आफ्रिदी खूप संस्कारी असल्याचे सांगितले जाते. तो त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल कधीच माध्यमांसमोर बोलत नाही. मात्र जेव्हा-जेव्हा त्याला त्याच्या पत्नी विषयी विचारले जाते, तो दिलखुलासपणे उत्तरे देतो.
>> एका इंटरव्हूमध्ये शाहिदला त्याच्या लग्नासंदर्भात विचारले असता त्याने सांगितले होते की, एका दौर्यावर जाण्याआधी मी माझ्या वडिलांची मजाक केली होती.
>> मी त्यांना म्हणालो होतो की, माझासाठी एक मुलगी बघा. मात्र माझे बोलने त्यांनी जरा जास्तच सिरिअस घेतले.
>> जेव्हा मी टोर्नामेंट संपल्यावर परदेशातून पतरलो तेव्हा, ते मला घराच्या गच्चीवर घेऊन गेले आणि म्हणाले की, मी तुझा साखरपुडा उरकला आहे.
>> हे ऐकूण मी शॉक झालो. आश्चर्याची गोष्ट तर ही की, शाहिदची होणारी पत्नी दुसरी- तिसरी कुणी नसून त्याच्याच मामाची मुलगी नादिया होती.
लग्नानंतर पहिल्या सामन्यात चमकला
>> शाहिद आफ्रिदी आणि नादिया यांचा विवाह 22 ऑक्टोबर, 2000 रोजी झाला.
>> इंग्लंडविरुद्ध सीरीज सुरू होती. शाहिद लग्नाच्य दुसर्याच दिवशी टीमसोबत गेला होता.
>> लग्नानंतर लाहोरमध्ये झालेल्या या पहिल्याच सामन्यात आफ्रिदीने खळबळ उडवून दिली.
>> त्याने या सामन्यात हाफसेंच्युरी करत तब्बल 5 विकेट्स घेल्या. त्याला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले.
>> मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांनीही त्याचे कौतुक केले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, शाहिद आफ्रिदीच्या पर्सनल लाइफचे फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.