आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीच्या मुलीसोबत खेळत बसला शाहरुख; IPL मॅचमध्ये टिपले निरागस PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - चेन्नईच्या होम ग्राउंडवर कोलकाता नाइटरायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्या खेळलेल्या सामन्यात काही निरागस क्षण टिपले आहेत. बॉलिवुडचा किंग खान आणि केकेआरचा को-ओनर चेन्नईचा कर्णधार धोनीच्या मुलीसोबत खेळताना दिसून आला. तो आपल्या टीमला चिअर करण्यासाठी आला होता. त्याचवेळी त्याची नजर धोनीची चिमुकली झीवाकडे गेली. यानंतर शाहरुखला राहावले नाही. तो वेळीच तिच्याकडे गेला आणि खेळायला लागला. त्याच ठिकाणी उपस्थित धोनीची पत्नी साक्षी आणि इतरांनी हे क्यूट मोमेंट आपल्या कॅमेऱ्यांत टिपले आहेत. शाहरुखच्या शेजारीच जूही चावलाची मुलगी जाह्नवी मेहता सुद्धा दिसून आली. 


असा रंगला सामना
आंद्रे रसेलच्या (88) नाबाद अर्धशतकाच्या बळावर कोलकाताने प्रथम फलंदाजी करत यजमान चेन्नईसमोर विजयासाठी 203 धावांचे खडतर लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात धोनीच्या सुपरकिंग्जने घरच्या मैदानावर 5 गड्यांच्या मोबदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले. या विजयामध्ये बिलिंग्जनेही (56) मोलाचे योगदान दिले. त्यामुळे चेन्नई टीमच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. तसेच कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 25, वॉटसनने 42 आणि अंबाती रायडूने 39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे टीमला आपली लय कायम ठेवता आली.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...