आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेन वॉर्नने 100 कोटींचा बंगला विकून घेतले छोटेशे घर; आतून दिसते असे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - ऑस्ट्रेलियन क्रिकेट लेजंड शेन वॉर्नने मेलबर्नच्या ब्रिंगटन येथे एक नवीन बंगला खरेदी केला आहे. हेराल्ड सनच्या वृत्तानुसार, हा नवीन बंगला त्याच्या जुन्या घराच्या अगदी जवळ आहे. नवीन असले तरीही शेन वॉर्नच्या जुन्या बंगल्याच्या तुलनेत हे घर छोटे आहे. 5 बेडरुम, 3 बाथरुम आणि एका स्वीमिंग पूलसह थिएटर रूम, बार आणि एक अंडरग्राउंड गॅरेज आहे. या गॅरेजमध्ये 4 कार पार्क होऊ शकतात. गेल्या महिन्यातच शेन वॉर्नने आपला जुना बंगला सव्वा अब्ज रुपयांत विकला. त्याच्या नवीन घराची किंमत 36 कोटी आखली जात आहे. 

 

यामुळे विकले जुने घर...
- शेन वॉर्न जगभरात ट्रॅव्हेल करत असतो. घरात जास्त वेळ राहत नसल्यानेच त्याने आपले जुने आणि मोठे घर विकण्याचा निर्णय घेतला असे सांगितले जात आहे. प्रॉपर्टी डीलिंग एजंसीने सुद्धा माध्यमांशी संवाद साधताना हेच कारण वर्तवले आहे. 
- घर छोटे असले तरीही यात अंडरग्राउंड गॅरेजसह मोठे स्वीमिंग पूल आणि मनोरंजनाची सर्व साधने उपलब्ध आहेत. यापूर्वीचे घर खूप मोठे होते. त्या घराची साफ-सफाइ आणि मेंटेनन्स नेहमीच देशाबाहेर राहणाऱ्या शेन वॉर्नसाठी कठिण झाले होते. 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेन वॉर्न येण्यापूर्वी या घराचा मालक एएफएल स्टार मॅथ्यू लॉयड होता.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, शेन वॉर्नच्या नवीन घराचे Inside Photos...

बातम्या आणखी आहेत...