आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL मध्ये रंगली चुरशीची लढत, तेवढ्यात उथप्पाच्या पत्नीच्या तोंडून निघाली शिवी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - IPL 2018 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात हैदराबादने केकेआरला 14 धावांनी पराभूत करत उप-विजेत्याचे पद निश्चित केले आहे. फायनलची लढत आता चेन्नई सुपरकिंग्स (CSK) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात रंगणार आहे. मॅचमध्ये कोलकाताने प्रथम टॉस जिंकून फील्डिंगचा निर्णय घेतला. हैदराबादने कोलकाताला विजयासाठी 175   चे आव्हान दिले. पण, केकेआरचा संघ 160 धावाच करू शकला. मॅचमध्ये एक वेळी अशीही आली, जेव्हा केकेआरचा खेळाडू रॉबिन उथप्पाची पत्नी शिवी देताना दिसून आली. हा मोमेंट शेवटच्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलमध्ये घडला. कार्लोस ब्रेथवेटच्या चेंडूवर शिवम मावी आउट झाला. राशिद खानने ती कॅच घेतली होती. त्यावेळी केकेआरचा स्कोर 160/7 रन एवढा होता. तसेच विजयासाठी 5 बॉलमध्ये 15 धावा आवश्यक होत्या. शिवम आउट झाल्यानंतर जेव्हा टीव्ही कॅमेरा शीतल उथप्पाकडे वळला तेव्हा ती तिच्या तोंडून F#@$ निघाल्याचे दिसून आले. 


मॅच समरीः
सनरायझर्स हैदराबाद - 174/7 (20 ओव्हर) (साहा- 35, धवन- 34, राशिद- 34, शाकिब- 28)
कोलकाता नाइटरायडर्स- 160/9 (20 ओव्हर) (क्रिस- 48, शुभमन- 30, सुनील- 26, राणा- 22)
MoM - राशिद खान (10 बॉल 34* रन, 3/19 विकेट, 2 कॅच)


पुढील स्लाइड्सवर पाहा, या मोमेंटचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...