आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता धोनीच्या टीमकडून पराभूत झाला विराटचा संघ, असा ट्रोल झाला चिकू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - आयपीएल 2018 च्या 24 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुला 5 विकेट्सने पराभूत केले. चेन्नईला विजयासाठी 206 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी 19.4 ओव्हरमध्ये पूर्ण केले. मॅचमध्ये चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीला जबरदस्त बॅटिंगमुळे सामनावीर घोषित करण्यात आले. त्याने 34 बॉलमध्ये 70* धावांची इनिंग खेळली. यात 1 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. धोनीनेच टीमसाठी विजयी षटकार सुद्धा लावला. यानंतर सोशल मीडियावर सोशल मीडियावर बेंगलुरूचा कर्णधार विराट कोहली उर्फ चिकू आणि त्याच्या संघाला ट्रोल करण्यात आले. तसेच धोनीचे तोंडभर कौतुक झाले. 


- मॅचमध्ये टॉस जिंकल्यानंतर चेन्नईने प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला. बेंगलुरुकडून डिकॉक (53) आणि एबी डिव्हिलिअर्स (68) ने जबरदस्त बॅटिंग करताना टीमला 142 धावांपर्यंत नेले. 
- शेवटच्या ओव्हरमध्ये मनदीप सिंह (32) आणि वॉशिंगटन सुंदर (13*) ने झपाट्याने बॅटिंग करत टीमचा स्कोर 205 पर्यंत ओढला. तोपर्यंत टीमचे 8 गडी तंबूत परतले होते. 
- त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी उतरलेल्या चेन्नईच्या अंबाती रायडूने 82 धावा काढल्या. त्याने धोनीसोबत मिळून 53 बॉलमध्ये 101 धावांची पार्टनरशिप केली. रायडू बाद झाला तोपर्यंत टीमचा स्कोर 175 पर्यंत पोहोचला. 
- शेवटच्या ओव्हरमध्ये चेन्नईला विजयासाठी 16 धावा हव्या होत्या. ब्राव्हो आणि धोनीने चौकार आणि षटकारांचा जणू पाऊसच पाडला. धोनीनेच षटकार लावून मॅच जिंकली. 


मॅच समरी
RCB- 205/8 (20 ओव्हर) 
डिकॉक- 53 रन (37 बॉल, 4 सिक्स), डिव्हिलिअर्स- 68 रन (30 बॉल, 8 सिक्स)
CSK- 207/5 (19.4 ओव्हर)
रायडू- 82 रन (53 बॉल, 8 सिक्स), धोनी- 70* रन (34 बॉल, 7 सिक्स)


पुढील स्लाइड्सवर पाहा, असा ट्रोल झाला विराट कोहली...

बातम्या आणखी आहेत...