आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रीती तुझे रूप किती... कधी फॅन्ससोबत Selfie, तर कधी फेकत होती गिफ्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोट्स डेस्क - आयपीएल 2018 मध्ये दिल्ली विरुद्धच्या सामन्यात पंजाबने 6 गडी राखून विजय मिळवला आहे. हा सामना मोहालीत खेळला गेला. पंजाबला सपोर्ट करण्यासाठी टीमची को-ओनर प्रीती झिंटावर सर्वांच्या नजरा टिकून होत्या. आपल्या टीमला चिअर करताना, फॅन्ससोबत सेल्फी काढताना आणि फॅन्सच्या गर्दीत गिफ्ट फेकताना तिच्या प्रत्येक अदावर साऱ्यांचे लक्ष होते. 


मॅच जिंकताच वाटले गिफ्ट
- या सामन्यात पंजाबने टॉस जिंकून प्रथम फील्डिंगचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीवर उतरलेल्या दिल्लीच्या संघाने कॅप्टन गौतम गंभीरच्या बळावर 167 धावांचे लक्ष्य उभे केले. दिल्लीकडून सर्वाधिक 55 धावा गंभीरनेच काढल्या. 
- पंजाबने या लक्ष्याचा पाठलाग करत 19 व्या ओव्हरमध्येच विजय मिळवला. यात केएल राहुलने आयपीएलचे सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले. त्याने फक्त 14 बॉलमध्ये 51 धावा काढल्या. असे करून त्याने युसूफ पठाणसह दिग्गजांचा विक्रम मोडीस काढला आहे. 
- मॅच जिंकताच प्रीती इतकी खुश झाली की लगेच मैदानावर उतरून फॅन्ससोबत सेल्फी काढण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे, तर तिने आपल्या टीमच्या समर्थकांमध्ये गिफ्ट सुद्धा फेकले. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, प्रीती झिंटाचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...