आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 वर्षांत प्रथमच अशी सिरीझ खेळणार टीम इंडिया, विराट-धोनीविना पोहोचले श्रीलंकेला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारतीय क्रिकेट संघ 6 मार्च रोजी निदाहास ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यासाठी श्रीलंकेच्या विरोधात उतरणार आहे. 2006 पासून टी-20 क्रिकेट खेळणारी टीम इंडिया 12 वर्षांत प्रथमच या फॉर्मेटच्या ट्रायंगुलर सिरीझमध्ये खेळत आहे. टेस्ट क्रिकेट खेळलेल्या 10 देशांमध्ये भारतानंतर केवळ दक्षिण आफ्रीका आणि वेस्टइंडीझ असे संघ आहेत ज्यांनी अशा प्रकारच्या मालिकेत सहभाग घेतला नाही. 

 

श्रीलंकन क्रिकेट बोर्डला 50 कोटींचा नफा
- या टूर्नामेंटमध्ये श्रीलंकन बोर्डला 50 कोटी रुपयांचा नफा मिळणार आहे. केवळ भारत या मालिकेचा भाग असल्याने श्रीलंकेला हा फायदा होत आहे. 
- भारत या सिरीझमध्ये असल्यामुळेच मीडिया राइट्स, स्टेडिअमच्या आतील जाहिराती आणि अधिकार मोठ्या किमतींवर गेल्या आहेत. 
- बीसीसीआयने गतवर्षी आयसीसीच्या गवर्नन्स मॉडेलमध्ये झालेल्या बदलांचा विरोध केला होता. त्यासाठी काहीच मते मिळाली नसल्याने पराभवाचाही सामना करावा लागला. त्यावेळी फक्त श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने भारताची साथ दिली होती. या सिरीझमध्ये सहभागी होऊन भारताने एकप्रकारे श्रीलंकेला धन्यवाद केले आहे. 


500 व्या सामन्यासाठी धोनीला करावी लागेल प्रतीक्षा...
- महेंद्र सिंह धोनीची या मालिकेसाठीची निवड जवळपास निश्चित मानली जात होती. पण, त्याने स्वतःहून निवडकर्त्यांकडे विश्रांती घेण्याची मागणी केली. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याने 497 सामने खेळले आहेत. मात्र, 500 सामने पूर्ण करण्यासाठी आता त्याला वाट पाहावी लागणार आहे. 
- धोनीच्या व्यतिरिक्त कॅप्टन विराट कोहली, फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह आणि ऑलराउंडर हार्दिक पंड्याला सुद्धा विश्रांती देण्यात आली आहे. विराटच्या जागी टीमचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...