आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पोर्ट्स डेस्क - 2017 चे सर्वात चर्चित लग्न ठरलेल्या विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा दुसरा रिसेप्शन सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. परळच्या सेंट रेजिस हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री 8.30 वाजता सुरू होणाऱ्या रिसेप्शन सोहळ्यात टीम इंडियाचे क्रिकेटर्स, बॉलिवुड स्टार्स आणि मुख्यमंत्र्यांसह राजकीय नेते मंडळी देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दिल्लीत झालेल्या पहिल्या रिसेप्शनला शिखर धवन, सुरेश रैना आणि गौतम गंभीरसारख्या क्रिकेटर्सने सहकुटुंब हजेरी लावली होती. तर, माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि रोहित शर्मासह टीम इंडियाचा दुसरा कुठलाही खेळाडू दिल्लीत पोहोचला नव्हता. ते सगळेच मुंबईच्या रिसेप्शनला हजेरी लावणार अशी शक्यता आहे.
अशी आहे संभावित गेस्ट लिस्ट...
रिसेप्शनमध्ये टीम इंडियासह बीसीसीआयचे अधिकारीही सहभागी होणार आहेत. बॉलिवुड लेजन्ड अमिताभ बच्चन यांच्यासह सलमान, शाहरुख आणि आमिर खान उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. यासोबतच सचिन तेंडुलकर, झहीर खान, विरेंद्र सेहवाग, आशीष नेहरा आणि इतर एक्स क्रिकेटर देखील यात पोहचणार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीची शक्यता
विराट-अनुष्काच्या दिल्लीतील रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली होती. मुंबईच्या रिसेप्शन सोहळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे, या दुसऱ्या रिसेप्शनला मुख्यमंत्री सपत्निक पोहोचणार अशी शक्यता आहे.
काय होती कार्डवरील चूक?
वेडिंग एटिकेटनुसार, “request the honour of your presence” लग्न एखाद्या धार्मिक स्थळी होत असल्यास लिहिले जाते. अनुष्का आणि विराटच्या दिल्लीच्या रिसेप्शन पत्रिकांवर “request the honour of your presence” असा उल्लेख होता. ती चूक मुंबईच्या रिसेप्शन कार्डमध्ये सुधारण्यात आली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, विराटच्या रिसेप्शन कार्ड आणि संभावित गेस्ट...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.