आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2nd टेस्ट टीममधून भुवनेश्वर बाहेर; फॅन्स संतप्त, दिग्गजांनाही धक्का

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी टीममध्ये बदल करण्यात आले. यात भुवनेश्वर कुमारला टीमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा देण्यात आली नाही. सेंच्युरिनय मैदानात होत असलेल्या या सामन्यावर आता क्रिकेट फॅन्स संतप्त झाले आहेत. केवळ फॅन्सच नव्हे, तर दिग्गजांनीही भुवीला प्लेइंग इलेव्हनमध्ये नाही घेण्याच्या निर्णयावर सवाल उपस्थित केले. कॅप्टन विराट कोहलीने भुवीच्या जागी इशांत शर्माला खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर
- केपटाउनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाला 72 धावांनी पराभव चाखावा लागला होता. मात्र, याच सामन्यात भुवीने पहिल्या इनिंगमध्ये 4 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 2 विकेट घेतल्या होत्या. तो भारताचा टॉप विकेट स्कोरर होता. 
- भुवीला टीममध्ये न घेण्यावर माजी क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मणने रोष व्यक्त केला. 'भुवनेश्वरला प्लेइंग इलेव्हनमध्ये नाही घेतल्याचे पाहून मला धक्का बसला आहे. पहिल्या टेस्टमध्ये त्याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. काहीतरी हरवल्यासारखे वाटते.' असे लक्ष्मण म्हणाला.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, भडकलेल्या फॅन्सच्या संतप्त प्रतिक्रिया...

बातम्या आणखी आहेत...