आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

U-19 वर्ल्ड कपमध्ये हिरो ठरला हा क्रिकेटर, अर्जुन तेंडुलकरचा खास मित्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये मॅन ऑफ द सिरीझ ठरलेला शुभमन गिल आता स्टार बनला आहे. अख्ख्या टूर्नामेंटमध्ये त्याचीच चर्चा सुरू होती. पंजाबच्या मोहालीपासून 300 किमी अंतरावर एका गावात राहणारा शुभमन अर्जुन तेंडुलकरचा खास मित्र आहे. शुभमन या वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा काढणारा आणि एकूणच दुसरा सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला आहे. 

 

अशी झाली सुरुवात...
8 सप्टेंबर 1999 रोजी 'छाक खेडेवाला' नावाच्या छोट्याशा गावात जन्मलेला शुभमन याचे वडील लखथविंदर सिंह जमीनदार होते. लखविंदर यांनाही क्रिकेटची खूप आवड होती. मात्र, गावात क्रिकेट खेळण्यासाठी सुविधा नव्हत्या. आपल्या मुलामध्ये लहानपणापासूनच क्रिकेटचे वेड पाहता त्यांनी त्याला ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली. 

 

वयाच्या 14 व्या वर्षी केली 587 धावांची पार्टनरशिप
शुभमनतचे नाव आजही अंडर-16 च्या एक मॅचमध्ये त्याने निर्मल सिंगसोबत केलेल्या रेकॉर्ड 587 धावांच्या पार्टनरशिपमुळे घेतले जाते. या परफॉर्मंसनंतरच त्याच्या वडिलांनी मोहालीत शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. जबरदस्त प्रदर्शनामुळेच त्याची अंडर-19 क्रिकेट टीममध्ये निवड झाली. यानंतर त्याला इंडिया अंडर-23 मध्ये खेळण्याची सुद्धा संधी मिळाली. 

 

टूर्नामेंटमध्ये काढल्या 300+ धावा
- शुभमनने वर्ल्डकपमध्ये खेळलेल्या 6 सामन्यांत एकूणच 372 धावा काढल्या आहेत. पाकिस्तानविरुद्ध सेमीफायनलमध्ये नाबाद 102 धावा काढून आपला बेस्ट स्कोर दिला. त्याने टूर्नामेंटमध्ये एक सेंचुरी आणि 3 हाफ सेंचुरी लावल्या आहेत. 
- टूर्नामेंटमध्ये जबरदस्त शॉट आणि चिकाटी पाहून त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीशी केली जात आहे. शुभमनने झिम्बाब्वेच्या विरोधात एका मॅचमध्ये विराटच्या शॉटची कॉपी केली होती. त्याने स्वतः विराटला आपली प्रेरणा मानत असल्याचे म्हटले होते. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, शुभमन गिलचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...