आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्सर आहे शिखर धवनची पत्नी, फेसबूकवर DP पाहताच पडला होता प्रेमात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - गब्बर म्हणूनही ओळखल्या जाणारा इंडियन क्रिकेटर शिखर धवनने 2012 मध्ये ऑस्ट्रेलियात राहणारी भारतीय वंशाची आयशासोबत संसार थाटला. ती धवनपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. तसेच तिचे हे दुसरे लग्न असून यापूर्वीच्या लग्नातून तिला दोन मुली होत्या. 2014 मध्ये तिने शिखरचे बाळ झोरावरला जन्म दिला. शिखरशी विवाह करणारी आयशा एक अॅमेचर बॉक्सर आहे. इंस्टाग्राम स्टार असलेली आयशाचे 1 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

 

फेसबूकवर DP पाहून फिदा झाला होता धवन
> फेसबूकवर फ्रेन्ड्स सजेशनमध्ये एकेदिवशी शिखर धवनने आयशाचा प्रोफाइल फोटो पाहिला. तो फोटो पाहताक्षणी शिखर आयशावर फिदा झाला. यानंतर ती हरभजन सिंगची फेसबूक फ्रेंड असल्याचे कळाल्यानंतर त्याने भज्जीकडे धाव घेतली.
> हरभजनशी चर्चा केल्यानंतर शिखर धवनने आयशाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. आयशाने ती स्वीकारली आणि दोघांचे चॅटिंग सुरू झाले. याच दरम्यान, ते एकमेकांच्या प्रेमात पडले. आयशानेच शिखरला प्रपोज केले होते असे सांगितले जाते.
> दोघांच्या वयात 10 वर्षांचे अंतर असल्याने अडचणी येत होत्या. मात्र, धवनच्या आईनेच पुढाकार घेऊन त्यांचे लग्न लावून दिले. 2012 मध्ये हे दोघे विवाहाच्या बंधनात अडकले.

 

कोण आहे आयशा..?
> 27 ऑगस्ट 1975 रोजी आयशाचा जन्म पश्चिम बंगालच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तिची आई ब्रिटिश नागरिक तर वडील भारतीय होते. 
> आयशाचे आई-वडील भारतात एकाच फॅक्ट्रीत काम करत होते. यानंतर त्यांना ऑस्ट्रेलियात काम करून तेथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 
> अतिशय धार्मिक असलेली आयशा एक अॅमेचर बॉक्सर आहे. शिखर धवनशी विवाह करण्यापूर्वी तिने एका ऑस्ट्रेलियन उद्योजकाशी विवाह केला होता. 10 वर्षांच्या संसारात तिने दोन मुलींना जन्म दिला. वैयक्तिक कारणांमुळे तिने आपल्या पतीला घटस्फोट दिला.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, ग्लॅमरस आणि फिट आयशा धवनचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...