आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर विराट आणि अनुष्काचे इटलीच्या मिलानमध्ये शुभमंगल; ट्वीट करुन दिली स्वत: माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- इटलीच्या टस्कनी प्रांतातील बोर्गो फिनेशिटो रिसॉर्टमध्ये सोमवारी विराट-अनुष्का यांचा विवाहसोहळा पार पडला. सचिन-शाहरुखसह ५० लोकांनाच निमंत्रण होते. फक्त १०० लोकसंख्येच्या बिबिआनो गावातील हे रिसॉर्ट जगातील दुसरे सर्वात महागडे आहे. डिसेंबरमध्ये ते बंद असते. पण, या लग्नासाठी खास सुरू ठेवण्यात आले. २१ डिसेंबरला दिल्ली व २६ ला मुंबईत स्वागत समारंभ होईल. 

 

अनुष्का/विराटचे ट्विट

आम्ही एकमेकांना सदैव प्रेम बंधनात राहण्याचे वचन दिले आहे. चाहते, आप्तांच्या प्रेमाने हा दिवस आणखीच खास होईल. आमच्या आयुष्याचा हिस्सा बनल्याबद्दल धन्यवाद.

 

2013 मध्ये सुरु झाली लव्ह स्टोरी..
विराट-अनुष्काची लव्ह स्टोरी चार वर्षांपूर्वी सुरु झाली होती. त्यावेळी हे दोघे पहिल्यांदा एका कमर्शिअल अॅडमध्ये एकत्र झळकले होते. त्यावेळी अनुष्काचे रणवीर सिंहसोबत ब्रेकअप झाले होते, तर विराटसुद्धा एकटाच होता. अशात दोघांमध्ये जवळीक वाढली, हळूहळू मैत्री झाली आणि लवकरच या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. विराट साउथ आफ्रिकेच्या टूरवरुन परतल्यानंतर अनुष्काने त्याला रिसीव्ह करण्यासाठी कार पाठवल्यानंतर दोघांची लव्ह स्टोरी उघड झाली होती. विराट-अनुष्काने कधीही आपल्या नात्याची कबुली दिली नव्हती. अनुष्का नेहमीच विचारला आपला चांगला मित्र असल्याचे सांगत होती.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, या कपलच्या लव्ह लाइफमध्ये आलेले चढ उतार, आणखी काही फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...