आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर इतके कोटी कमवणार विराट-अनुष्का, अशी होणार कमाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - विराट कोहलीने आपली गर्लफ्रेंड अनुष्कासोबत विवाह केला आहे. दोघांचा सीक्रेट विवाह सोहळा इटलीतील टस्कनी येथे पार पडला. यानंतर दोघांनीही सोमवारी ट्वीट करून लग्नाच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला. लग्नानंतर विराट आणि अनुष्का सर्वाधिक कमाई करणारे कपल ठरू शकते. दोघांचे नेट वर्थ 610 कोटींच्या घरात असल्याचा अंदाज आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, विराट-अनुष्काने ट्वीट करत आपल्या लग्नाच्या वृत्तास अधिकृत दुजोरा दिला. यावेळी विराटच्या ट्वीटला 3 तासांतच 2.15 लाख लाइक मिळाले आहेत. हे 2017 मध्ये त्याला मिळालेले सर्वाधिक लाइक आहेत. तर अनुष्काचे ट्वीट 1.50 लाख वेळा लाइक करण्यात आले आहे. 

 

अशी होते विराटची कमाई
> विराटचे वार्षिक उत्पन्न 121 कोटी रुपये आहे. तर त्याची नेटवर्थ 390 कोटी आहे. 
> यात मॅचमधून मिळणारी फी, BCCI आणि IPL कडून येणारी सॅलरी आणि ब्रॅन्ड एंडॉर्समेंटच्या फीचा समावेश आहे. 
> विराट BCCI च्या करारात ग्रेड-ए क्रिकेटर आहे. अशा यादीत समाविष्ट असणाऱ्या क्रिकेटर्सला वार्षिक 12 कोटी रुपये दिले जातात. 
> या व्यतिरिक्त क्रिकेटच्या वेग-वेगळ्या सामन्यांमध्ये होणारी कमाई वेगळी आहे. प्रत्येक मॅचसाठी विशिष्ठ अशी रक्कम दिली जाते. 
> आयपीएलच्या प्रत्येक सीझनमध्ये विराट 14 कोटी रुपयांची कमाई करतो. त्याच्याकडे 9 कोटी रुपयांच्या आलीशान कार आहेत. 
> कोहलीने कित्येक ब्रॅन्ड एन्डॉर्स केल्या आहेत. त्यामध्ये Puma, MRF, Fastrack, मान्यवर, WROGN सह अनेकांचा समावेश आहे. 
> विराटकडे दिल्ली आणि मुंबईत सुद्धा कोट्यावधींची घरे आहेत. तो फोर्ब्समध्ये सर्वाधिक कमाई करणारा 7 वा स्पोर्ट्सपर्सन आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, अशी आहे अनुष्काची कमाई, दोघांची संयुक्त गुंतवणूक...

बातम्या आणखी आहेत...