आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली लग्नानंतर आपल्या 34 कोटी रुपयांच्या फ्लॅटमध्ये राहणार होता. पण, तो अद्याप आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये गेलेला नाही. तो अजुनही मुंबईत एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतो. एवढेच नव्हे, तर पुढचे वर्षभर तो येथेच राहणार आहे. काही दिवसांपूर्वीच विराटने सोशल मीडियावर एका फ्लॅटमधून फोटो शेअर केले होते. ते फ्लॅट त्याने अनुष्कासोबत रेंटवर घेतले आहे.
मासिक भाडे 15 लाख
- विराट कोहली आणि अनुष्का सध्या मुंबईत ज्या फ्लॅटमध्ये राहत आहेत त्याचे मासिक भाडे 15 लाख रुपये आहे. राहेजा लेजंड बिल्डिंगमध्ये त्यांचे फ्लॅट 40 व्या मजल्यावर आहे. 2700 चौरस फुट एवढा या फ्लॅटचा आकार आहे.
- माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, विराट आणि राहेजा बिल्डर्स यांच्यात ही डील ऑक्टोबर 2017 मध्ये झाली होती. विराटने 24 महिन्यांसाठी हा फ्लॅट भाड्यावर घेतला आहे. रेंटल अॅग्रीमेंट 15 डिसेंबरपासून सुरू झाला आहे. विराटसोबतच अनुष्काने सुद्धा त्यावर स्वाक्षरी केली. हे फ्लॅट वर्सोव्हा येथे आहे.
34 कोटींच्या फ्लॅटचे बांधकाम सुरूच
- विराटने 2016 मध्ये मुंबईतील ओमकार 1973 अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट खरेदी केले होते. 7000 चौरस फुट अशा प्रशस्त फ्लॅटची किंमत 34 कोटी रुपये होती.
- डिसेंबर 2017 मध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत विवाह करणारा विराट कोहली सपत्निक या फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार अशी शक्यता होती.
- मात्र, विराटच्या या ड्रीमहोमचे बांधकाम अजुनही सुरूच आहे. पूर्णपणे बांधकाम होण्यासाठी आणखी 1 वर्ष लागणार आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, विराटच्या 34 कोटींच्या फ्लॅटचे काही फोटोज...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.