आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट कोहलीला Slip Disc समस्या नाही, तो काउंटी क्रिकेट खेळणार; BCCI ची स्पष्टोक्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - विराट कोहलीला स्लिप डिस्कची समस्या नाही. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने विराट जखमी असल्याच्या अफवांवर विराम लावला आहे. प्रत्यक्षात तो दमला आहे. त्यामुळे, काउंटी क्रिकेट कार्यक्रमासाठी त्याच्या शेड्युलमध्ये काही बदल केले जाऊ शकतात असे बीसीसीआयने स्पष्ट केले. 


- भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) च्या       एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेशी संवाद साधताना माहिती दिली, की विराटला नेक स्प्रॅनची समस्या आहे. त्याला स्लिप डिस्कचा काहीच त्रास नाही. 
- "मुळातच सलगच्या सामन्यांमुळे विराटला थकवा आला आहे. ही समस्या काही जखमी झाल्यामुळे नाही, तर कामाच्या ओझामुळे उद्भवली आहे. आम्ही त्याच्या काम आणि शेड्युलवर नजर ठेवून आहोत."
- "आम्ही एक प्लॅन तयार करत आहोत. यामध्ये काउंट क्रिकेटमध्ये विराटकडून खेळल्या जाणाऱ्या सामन्यांमध्ये काही कपात केली जाऊ शकते. तो चार दिवसीय 2 सामने खेळणार आहे." 


फिटनेस व्हिडिओचा दाखला...
विराट फिट असल्याचे सांगताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या फिटनेस व्हिडिओचा दाखला दिला. केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोर यांनी विराट आणि इतर सेलिब्रिटींना टॅग करून फिटनेस चॅलेंज करणारा व्हिडिओ पोस्ट केला होता. विराटने तो स्वीकारून आपला फिटनेस व्हिडिओ पोस्ट केला. तसेच पीएम मोदींना फिटनेस चॅलेंज व्हिडिओसाठी आव्हान दिले आहे. मोदींनी ते आव्हान स्वीकारून लवकरच व्हिडिओ पोस्ट करणार असे सांगितले आहे.

 

मुंबईत झाले होते विराटचे चेक-अप
मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही दिवसांपूर्वीच विराटची मुंबईतील रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी विराटच्या कमरेची डिस्क खिसकल्याचे सांगितले जात होते. पण, बीसीसीआयने ती शक्यता फेटाळून लावली आहे. जूनपासून विराट काउंट क्रिकेटमध्ये सरे टीमकडून सहभागी होत आहे. यानंतर जूनमध्ये आयरलंड विरोधात 2 टी-20 सामने खेळणार आहे.

 

बातम्या आणखी आहेत...