आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवटच्या टी-20 सामन्यात शिखरची चंपी करत होता विराट, दिसला असा मूड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारताने दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या टी-20 सामन्यात 7 धावांनी पराभूत करून मालिका 2-1 ने जिंकली. आफ्रिकेत शनिवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताची बॅटिंग सुरू असताना विराट कोहलीचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. तो फिटनेसमुळे हा सामना खेळू शकला नाही. त्याच्या जागी रोहित शर्माने टीमचे नेतृत्व केले. तो आपला सहकारी शिखर धवनला मसाज देत होता.

 

- मॅच सुरू असताना एका ठिकाणी विराट कोहली आपला लाडका मित्र शिखर धवनची चंपी करत होता. शेवटची ओव्हर सुरू असताना हा क्षण लाइव्ह कॅमेऱ्यात टिपला आहे. 
- 19.4 ओव्हरमध्ये 168 च्या स्कोरवर दिनेश कार्तिकची विकेट पडली. त्याचवेळी ड्रेसिंग रुमकडे कॅमेरा फिरला. तेव्हा विराट चक्क शिखरला हेड मसाज देताना दिसून आला. 
- या सामन्यात विराटने बॅटिंग केली नाही. तरीही शिखर धवनने जबरदस्त फलंदाजी करत 40 बॉलमध्ये 47 धावा काढल्या. 
- मॅचमध्ये 27 बॉलमध्ये 43 धावा करणाऱ्या सुरेश रैनाला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले. तर 7 विकेट घेणारा भुवनेश्वर कुमार प्लेअर ऑफ द सिरीझ ठरला आहे. 

 

असा होता सामना
भारत - 172/7 (20 षटक)
दक्षिण आफ्रीका - 165/6 (20 षटक)
निकाल - भारताचा 7 धावांनी विजय

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, मॅच सुरू असताना व जिंकल्यानंतर टीमचे आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...