आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Instagram वर एका फोटोचे इतके कमावतो विराट; पण या बाबतीत राहिला मागे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - फोटो शेअरिंग अॅप इंस्टाग्रामने भारतात प्रथमच पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराटला 'मोस्ट एंगेज्ड सेलिब्रिटी' निवडले गेले आहे. त्याच्या पोस्टवर यूझर्सने सर्वाधिक लाइक केले आहेत. इंस्टाग्रामकडून इतर अनेक देशांमध्ये अशा प्रकारच्या पुरस्कारांची घोषणा केली जाते. पण, भारतात अशा प्रकारच्या अवॉर्ड्सची ही पहिलीच वेळ आहे. 

 

- इंस्टाग्रामने भारतात वाढत्या यूझर्सची संख्या लक्षात घेता या पुरस्कारांची घोषणा केली आहे. जगभरात इस्टाग्रामचे 80 कोटी यूझर्स आहेत. त्यापैकी 5 कोटी एकट्या भारतात आहेत. 
- इंस्टाग्रामवर विराट कोहलीचे 1 कोटी 98 लाख फॉलोअर्स (21 मार्च 2018 पर्यंत) आहेत. सोशल मीडियातून होणाऱ्या कमाईच्या बाबतीत विराट नंबर एक ठरला आहे. 
- फोर्ब्सने सुद्धा आपल्या एका रिपोर्टमध्ये विराट आपल्या एका पोस्टने 3.2 कोटी रुपयांची कमाई करतो असे स्पष्ट केले आहे. ही कमाई त्याच्या पोस्टवर होणारी यूझर एंगेजमेंट आणि जाहिरातींच्या माध्यमातून होते. 

 

वाइफसोबत विराटचे फोटो सुपरहिट
- विराट कोहलीने 11 डिसेंबर रोजी अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत विवाह केला. त्यांच्या लग्नाच्या फोटोला तब्बल 45 लाखांहून अधिक लाइक आणि जवळपास दीड लाख कॉमेंट्स आल्या आहेत. 
- काही दिवसांपूर्वीच विराटने अनुष्कासोबत दुसरा एक फोटो शेअर केला होता, त्याला देखील 33 लाख लाइक मिळाले आहेत. त्यामुळेच, विराट मोस्ट यूझर एंदेज्ड सेलिब्रिटी ठरला आहे.
- इंस्टाग्रामवर ज्या फोटोमध्ये विराटसोबत अनुष्का आहे, त्या फोटोला सर्वाधिक लाइक आणि कॉमेंट मिळाल्याचे दिसून येते. त्यापैकीच 5 फोटो आणि त्यांना मिळालेले लाइक आम्ही आपल्याला दाखवत आहोत. 

 

कोण जगात नंबर एक?
- जगातील सर्वाधिक फॉलोअर्स स्वतः इस्टाग्रामच्या ऑफिशिअल अकाउंटला आहे. त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 23.30 कोटी इतकी आहे. 
- यानंतर सर्वाधिक फॉलोअर्समध्ये अमेरिकन सिंगर आणि जस्टिन बीबरची माजी प्रेयसी सेलेना गोम्झ नंबर एकवर आहे. तिचे इंस्टाग्रामवर 13.41 कोटी फॉलोअर्स आहेत. 
- तसेच जगात दुसऱ्या क्रमांकावर फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो आहे. त्याच्या फॉलोअर्सची संख्या 12.20 कोटी इतकी आहे. 

 

यांच्या तुलनेत विराट मागे...

- भारतात विराट इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा सेलिब्रिटी असला तरीही सर्वात जास्त फॉलोअर्सच्या बाबतीत तो अभिनेत्री दीपिका पादुकोणपेक्षा मागेच आहे. ती भारतात नंबर एक असून तिचे 2 कोटी 24 लाख फॉलोअर्स आहेत. 
- सोबतच 2 कोटी 21 लाख फॉलोअर्ससह प्रियांका चोप्रा दुसऱ्या क्रमांकावर आहे. आलिया भट्‌ट आणि श्रद्धा कपूर यांचेही प्रत्येकी 2-2 कोटी फॉलोअर्स आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, लाइक्सनुसार विराटचे सर्वात फेमस 5 फोटो...

बातम्या आणखी आहेत...