आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Retirement नंतर सध्या काय करतोय मास्टर ब्लास्टर सचिन, जाणून घ्या त्याचा बिझनेस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकरने क्रिकेट खेळण्यापासून संन्यास घेतला तरीही क्रिकेटच्या क्षेत्राशी त्याची नाळ अजुनही घट्ट जुळलेली आहे. सचिन आपले आयुष्य खेळाला देऊ इच्छित आहे. भारताला क्रीडा प्रेमी देशपासून खेळणारा देश बनवणे हे त्याचे स्वप्न आहे. यासाठी सचिनने आपली एक कंपनी स्थापित केली आहे. या कंपनीचे नाव SRK10 असे ठेवण्यात आले आहे. सचिनने 15 वर्षांचा असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वयाच्या 24 व्या वर्षी तो मास्टर ब्लास्टर म्हणून प्रसिद्ध झाला. वयाच्या 40 व्या वर्षी त्याने निवृत्तीची घोषणा केली. क्रिकेट करिअरमध्ये सचिनने आपले प्रत्येक स्वप्न साकार केले आहे. टेस्ट मॅचपासून वर्ल्ड कप जिंकण्यापर्यंत असो की टीमला प्रत्येक फॉरमॅटमध्ये नंबर एक बनवणे यात सचिनचे मोलाचे योगदान आहे. 


25 एप्रिल 2018 रोजी सचिन तेंडुलकरने एक ट्वीट करून सर्वांना आपल्या कंपनीच्या वेबसाइटची माहिती दिली. क्रिकेट जगताला सोडल्यानंतर त्याने सप्टेंबर 2016 मध्ये SRK10 नावाची कंपनी स्थापित केली. सचिनची पत्नी अंजली तेंडुलकर यात त्याची पार्टनर आहे. क्रीडा क्षेत्राशी अजुनही जुळलेल्या सचिनने ही कंपनी खास स्पोर्ट्स मॅनेजमेंटसाठी स्थापित केली आहे. ही कंपनी देशातील प्रसिद्ध क्रिकेटर्सचे प्रतिनिधित्व करते. 


क्रीडा जगत व्यतिरिक्त या कंपनीने सामाजिक कार्यात सुद्धा पुढाकार घेतला आहे. ही कंपनी आरोग्य संदर्भात लोकांना जागरुक करण्याचे काम करत आहे. सचिन यूनिसेफ, बीएमडब्लू आणि भारत सरकारच्या अनेक मोहिमांशी जोडलेला आहे. अनेक नामवंत कंपन्यांचा तो ब्रँड एम्बॅसेडर आहे. 

बातम्या आणखी आहेत...