आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट डिग्रीने DSP ची हवालदार बनली स्टार महिला क्रिकेटर; पंजाब पोलिसांची कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड - भारतीय महिला टी-20 क्रिकेट टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौरला पोलिस उपाधीक्षकाचे पद गमवावे लागले आहे. पंजाब सरकार आता तिला कायद्याने पात्रतेनुसार हवालदार पद देत आहे. आपल्या कागदपत्रांमध्ये तिने मेरठ विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केल्याचा दावा केला होता. परंतु, चौकशीत तिची ही डिग्री बनावट निघाली आहे. हरमनप्रीतचे वडिलांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांची मुलगी हवालदार पद स्वीकारणार नाही. एका बनावट डिग्रीमुळे भारताची स्टार महिला क्रिकेटर हरमनप्रीत डीएसपीची पोलिस कॉन्सटेबल झाली आहे.


डीजीपी एमके तिवारी यांनी सांगितल्याप्रमाणे, सरकारने यापूर्वीच एक पत्र लिहून हरमनप्रीत कौरला पाठवले आहे. त्यानुसार, 12 वी पासची पात्रता असल्याने आपल्याला हवालदार पदी नियुक्त केले जात आहे अशी सूचना देण्यात आली. यानंतर सरकारने हा पत्र परत मागवून तिला डीएसपी पदासाठी दिलेले निर्देश परत घेतले आहे. तिच्या विरोधात कुठलीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही. हरमनप्रीतने पुन्हा पदवी मिळवल्यास तिला डीएसपीच्या पदावर पुन्हा दावा करता येईल. तर दुसरीकडे, हरमनप्रीतच्या मॅनेजरने सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे हरमनच्या नोकरीसंदर्भात कुठलेही अधिकृत पत्र आले नाही. 


पंजाब पोलिसांनीच केली होती चौकशी
पंजाबच्या मोगा येथे राहणारी भारताची स्टार महिला क्रिकेटर हरमनप्रीत कौरने 1 मार्च रोजी राज्य पोलिसांत पोलिस उपाधीक्षकाचा पदभार स्वीकारला होता. यानंतर तिच्यावर बनावट डिग्री आणि कागदपत्रे दाखल करण्याचे आरोप झाले. यानंतर पंजाब पोलिसांच्या पथकाने स्वतः विद्यापीठात जाऊन हरमनच्या डिग्रीची चौकशी केली. यात तिची फायनल इयरची मार्कशीट बनावट असल्याचे समोर आले. हरमनच्या मार्कशीटवर जो परीक्षा क्रमांक आणि मार्क आहेत त्याचा विद्यापीठात रेकॉर्ड नाही.

बातम्या आणखी आहेत...