आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूसुफ पठाण डोप टेस्टमध्ये दोषी, बीसीसीआयकडून निलंबन; खोकल्याचे औषध घेतल्याचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारताचा अष्टपैलू क्रिकेटर यूसुफ पठाण डोप टेस्टमध्ये दोषी सापडला आहे. यामुळे, त्याला डॉमेस्टिक सामना खेळण्यापासून दूर ठेवण्यात आले आङे. 2011 च्या विश्वविजेता भारतीय संघाचा सदस्य राहिलेला इरफान पठाणवर कारवाईची अधिकृत माहिती मंगळवारी बीसीसीआयने जाहीर केली आहे. त्याने खोकल्याच्या औषधींमध्ये सापडणारा प्रतिबंधित ड्रग सेवन केला होता असे बीसीसीआयने स्पष्ट केले. 

 

काय आहे प्रकरण?
16 मार्च 2017 रोजी झालेल्या टी-20 सामन्याच्या वेळी यूसुफ पठाणने प्रतिबंधित उत्तेजक द्रव्य घेतल्याचा आरोप झाला होता. दिल्लीत झालेल्या त्या सामन्याच्या वेळीच यूसुफ पठाणची यूरीन टेस्ट घेण्यात आली होती. त्याचेच निकाल आता समोर आले आहेत. पठाणने प्रतिबंधित टर्ब्युटेलीन नावाचे ड्रग्स घेतले होते असे निष्पन्न झाले आहे. ऑक्टोबरमध्ये पठाणवर आरोप दाखल करण्यात आले होते. आरोप झाला तेव्हा आपण खोकल्यावर उपचार करण्यासाठी ते औषध घेतले होते. परफॉर्मंस वाढवण्यासाठी किंवा उत्तेजनासाठी ते औषध घेण्याचा हेतू नव्हता असे पठाणने म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...