आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटरने दाखवले केपटाऊनचे विहंगम दृश्य; चहल म्हणाला, आता उडी नको मारू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - दक्षिण आफ्रिकेत भारताचा ऐतिहासिक वनडे मालिका विजय सध्या चर्चेत आहे. भारताचे लक्ष आता त्याच देशात होणाऱ्या टी-20 सिरिझकडे लागले आहे. तत्पूर्वी वनडे मालिकेचा स्टार ठरलेला बॉलर कुलदीप यादवने केपटाउन शहराचे विहंगम दृश्य टिपून सोशल मीडियावर शेअर केले. तो केपटाऊनच्या टेबल माउंटेनवर बसला होता. त्यावर चहलने वेळीच आता उडी नको मारू असे कॉमेंट करत त्याची फिरकी घेतली. यावर पुन्हा यादवने लिहिले, चिंता करू नकोस मित्रा तुला सोबत घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे, या दोघांनी 5 वनडे सामन्यात एकूण 30 विकेट्स घेतल्या आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटो आणि दोघांनी केलेली मस्ती...