आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वात युवा अर्धशतकवीर पृथ्वीच्या श्रेयाने दिल्ली विजयी, काेलकाता टीमवर 55 धावांनी विजय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली - मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शाॅ (६२) अाणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या (नाबाद ९३) झंझावाताच्या बळावर तळातल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सने शुक्रवारी अायपीएलमध्ये विजय संपादन केला. पाच पराभवानंतर दिल्लीने सातव्या सामन्यात दाेन वेळच्या चॅम्पियन काेलकाता नाइट रायडर्सवर ५५ धावांनी मात केली. संघाच्या विजयात बाेल्ट, मॅक्सवेल, अावेश अाणि अमित मिश्राने प्रत्येकी दाेन विकेटचे याेगदान दिले.  दिल्लीने काेलकात्यासमाेर २२० धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात काेलकात्याने १६४ धावांपर्यंत मजल मारली. 

 

पृथ्वी शाॅ ठरला सर्वात युवा अर्धशतकवीर
विश्वविजेत्या भारतीय संघाचा युवा कर्णधार पृथ्वी शाॅने िदल्लीच्या विजयात अर्धशतकाचे माेलाचे याेगदान दिले. त्याने ४४ चेंडूंचा सामना करताना ७ चाैकार अाणि २ षटकारांसह ६२ धावांची खेळी केली. याशिवाय त्याने कर्णधार श्रेयससाेबत ६८ धावांची महत्त्वाची भागीदारी रचली.  यासह त्याने करिअरमधील दुसऱ्याच अायपीएल सामन्यात अर्धशतक ठाेकले. त्याचे हे पहिले अर्धशतक ठरले. तसेच यंदाच्या सत्रात ताे सर्वात युवा अर्धशतकवीर ठरला. त्याने यामध्ये युवा फलंदाज संजू सॅमसनला मागे टाकले. 

 

सामनावीर श्रेयसने नेतृत्वात मिळवून दिला विजय
मुंबईचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरने कर्णधारपदाची जबाबदारी सार्थकी लावताना दिल्लीची पराभवची मालिका खंडित केली. त्याने अापल्या नेतृत्वात दिल्लीला विजयी ट्रॅकवर अाणले. दिल्लीचा सात सामन्यांत हा दुसरा विजय ठरला. त्याने ४० चेंडूंत नाबाद ९० धावा काढल्या. यात ३ चाैकारासह १० उत्तुंग षटकारांचा समावेश अाहे. याशिवाय त्याने पृथ्वीसाेबत अर्धशतकी भागीदारीही केली. 

 

पुडे सलाईडवर पहा सामन्याचे धावफलक....

बातम्या आणखी आहेत...