आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राेहित शर्माचे विक्रमी द्विशतक, भारताची मालिकेत बराेबरी; श्रीलंकेचा 141 धावांनी पराभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहाली - कर्णधार रोहित शर्माच्या (२०८*) द्विशतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेला दुसऱ्या वनडेत १४१ धावांनी नमवले. रोहितने अनेक विक्रम मोडीत काढले. १० वर्षांच्या कारकीर्दीत तिसऱ्यांदा द्विशतक ठोकले. वनडे क्रिकेटला पहिल्या द्विशतकासाठी ३९ वर्षांची वाट पाहावी लागली होती. पहिला वनडे १९७१ मध्ये झाला. पहिले द्विशतक सचिनने २०१० मध्ये झळकावले होते. तेव्हापासून आजवर ७ द्विशतके ठोकली गेली. त्यातील ५ भारतीयांची आहेत. त्यातही तीन एकट्या रोहितची आहेत.

 

कर्णधार राेहित शर्मा अाणि युवा फलंदाज श्रेयस अय्यरच्या द्विशतकी भागीदारीमुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेसमाेर खडतर ३९३ धावांचे लक्ष्य ठेवता अाले.  युवा गाेलंदाज यजुवेंद्र चहल (३/६०) अाणि जसप्रीत बुमराहने (२/४३) धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला अवघ्या २५१ धावांवर राेखले. यासह भारताने माेठ्या फरकाने विजय संपादन केला. याशिवाय भारताने सलामीच्या सामन्यातील अापल्या पराभवाची परतफेड पाहुण्या टीमला केली. सामन्यात नाबाद द्विशतक ठाेकणारा राेहित शर्मा हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.  त्याने १५३ चेंडूंत १३ चाैकार अाणि १२ षटकारांच्या अाधारे नाबाद २०८ धावांची खेळी केली. त्याचे हे तिसरे द्विशतक ठरले. सलामीच्या पराभवानंतर सावरल्यावर भारताने हा माेठा विजय अापल्या नावे केला. 


प्रत्युत्तरात श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर थरंगा (७) अाणि गुणतिलका (१६) झटपट बाद झाले. त्यापाठाेपाठ थिरिमानेलाही २१ धावांचे याेगदान देऊन पॅव्हेलियन गाठावे लागले. 


मॅथ्यूजचे नाबाद शतक व्यर्थ 
झटपट विकेटमुळे अडचणीत सापडलेल्या टीमला माजी कर्णधार मॅथ्यूजने सावरले. त्याने नाबाद शतक ठाेकले. त्याने १३२ चेंडूंचा सामना करताना ९ चाैकार व ३ षटकारांच्या अाधारे नाबाद १११ धावा काढल्या. मात्र, त्याची ही शतकी खेळी व्यर्थ ठरली. त्याला टीमचा पराभव टाळता अाला नाही.    


श्रेयस-राेहितचा भागीदारीचा डाेंगर

अापला दुसरा अांतरराष्ट्रीय वनडे सामना खेळणारा युवा फलंदाज श्रेयस अय्यरही चांगलाच फाॅर्मात राहिला. त्याने वैयक्तिक अर्धशतकी खेळी करताना कर्णधार राेहित शर्मासाेबत भागीदारीचा डाेंगर रचला. त्याने दुसऱ्या विकेटसाठी २१३ धावांची माेठी भागीदारी रचली. यासह त्यांनी टीम इंडियाच्या धावसंख्येला गती दिली. त्यामुळे टीमला विक्रमी धावांचा पल्ला पार करता अाला. 

 

श्रेयसचे पहिले अर्धशतक

मुंबईच्या युवा फलंदाज श्रेयस अय्यरने अापल्या वनडे करिअरमध्ये अर्धशतकाचे खाते उघडले. त्याला दुसऱ्या वनडेत हे यश संपादन करता अाले. त्याने दुसऱ्या वनडेत ८८ धावांची खेळी केली.  त्याने ७० चेंडूंत ९ चाैकार अाणि २ षटकारांच्या अाधारे ही खेळी केली. तसेच त्याची ही करिअरमधील सर्वाेत्तम खेळी ठरली अाहे. यासह त्याचे हे पहिले अर्धशतक ठरले. त्याने गत अाठवड्यात १० डिसेंबर राेजी धर्मशालेतील वनडेत अापल्या अांतरराष्ट्रीय वनडे करिअरला सुरुवात केली. 

 

धवनच्या ६७ चेंडूंत ६८ धावा

भारताकडून धडाकेबाज फलंदाज शिखर धवन दुसऱ्या वनडेत चमकला. त्याने अर्धशतकाचे याेगदान दिले. त्याने ६७ चेंडूंत ६८ धावा काढल्या. यात त्याने ९ चाैकार मारले. कर्णधार अाणि सलामीवीर राेहित शर्मासाेबत टीमला शतकी भागीदारीची सलामी दिली. ताे गत सलामीच्या सामन्यात शुन्यावर बाद झाला. त्यानंतर   पुनरागमन करत त्याने अर्धशतक साजरे कले. 

 

रोहित शर्माच्या दोन्ही द्विशतकांनंतर श्रीलंका २५१ धावाच करू शकली 
रोहितचे हे श्रीलंकेविरुद्ध दुसरे द्विशतक आहे. कोलकात्यात २६४ धावा केल्या होत्या. तेव्हाही व आजही श्रीलंकन संघ २५१ धावाच करू शकला.

 

> 6 शतके ठोकली रोहितने यंदा. सलामीवीर म्हणून एका वर्षात सर्वाधिक शतके ठोकणारा तिसरा फलंदाज आहे. सचिनने ९, गांगुलीने ७ शतके झळकावली.

 

 

> 16 व शतक ठोकले रोहितने. सेहवागला (१५) मागे टाकले. आता भारतीय क्रिकेटपटूंत फक्त सचिन (४९), कोहली (३२) व गांगुली (२२) हेच रोहितच्या पुढे.

 

> 300+ धावा १०० व्यांदा  करणारा भारत जगातील पहिला संघ ठरला आहे.

 

चहलची धारदार गाेलंदाजी 
भारताचा युवा गाेलंदाज यजुवेंद्र चहल दुसऱ्या वनडेत चमकला. त्याने धारदार गाेलंदाजी करताना श्रीलंकेच्या अव्वल फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने ६३ धावा देत ३ गडी बाद केले. यादरम्यान त्याने डिकवेला, गुणारत्ने अाणि कर्णधार परेराला बाद केले. त्यापाठाेपाठ जसप्रीत बुमराहने २ विकेट घेतल्या. तसेच भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या व वाॅशिंग्टन सुंदरने प्रत्येकी १ बळी घेतला. 

 

श्रीलंकेविरुद्ध सलग दुसरे द्विशतक 
भारताच्या युवा फलंदाज राेहित शर्माने करिअरमध्ये तिसरे द्विशतक झळकावले. यादरम्यान त्याने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या द्विशतकाची नाेंद केली. या टीमविरुद्ध त्याने तीन वर्षांनंतर द्विशतक साजरे केले. यापूर्वी त्याने २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध वनडेत २६४ धावांची खेळी केली हाेती. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा या टीमविरुद्ध सामन्यात झंझावाती खेळी केली. 

 

यंदाच्या सत्रात सर्वाधिक षटकारांची उत्तंुग भरारी
राेहित शर्मा अाता यंदाच्या सत्रामध्ये ‘सिक्सर किंग’ बनला अाहे. त्याने सत्रात सर्वाधिक षटकारांनी उत्तंुग भरारी घेतली. त्याच्या नावे एका वर्षात ४१ षटकारांची नाेंद झाली. यादरम्यान त्याने सचिनला मागे टाकले. सचिनच्या नावे १९९८ मध्ये ४० षटकार अाहेत. यात गांगुलीच्या नावे २००० च्या वर्षात ३५ अाणि धाेनीचे २००५ मध्ये ३४ षटकार हाेते.

 

राेहितचा सत्रात शतकांचा षटकार 
भारताच्या सलामीवीर युवा फलंदाज राेहितने सत्रातील अापली शतकी लय कायम ठेवली. त्याने अाता सहावे शतक साजरे केले. यादरम्यान त्याने अापल्याच देशाच्या सचिन (१९९६), राहुल द्रविड (१९९०) अाणि विराट काेहलीच्या (२०१७) कामगिरीशी बराेबरी साधली. यांची सत्रात सहा शतके अाहेे. अाता त्याची नजर सातव्या शतकावर लागली.

 

कर्णधाराच्या भूमिकेत सर्वाधिक दुसरा माेठा स्काेअर 

भारतीय संघाचे नेतृत्व करताना राेहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध द्विशतकी खेळी केली. त्याची ही वनडेच्या इतिहासात कर्णधाराच्या भूमिकेतील दुसरी सर्वाधिक स्काेअरची खेळी ठरली. यामध्ये भारतीय संघाच्या माजी स्फाेटक फलंदाज सेहवाग २१९ धावांसह अव्वल स्थानावर अाहे. त्याने २०११ मध्ये इंदूर येथे विंडीजविरुद्ध सामन्यात ही खेळी केली हाेती. त्यापाठाेपाठ अाता राेहितने दुसरे स्थान गाठले. तिसऱ्या स्थानावर श्रीलंकेचा माजी कर्णधार जयसूर्या अाहे. त्याच्या नावे २००० मध्ये भारतविरुद्ध शारजा येथे १८९ धावा अाहेत.  त्याचे द्विशतक यादरम्यान हुकले हाेते. तसेच चाैथ्या स्थानावर असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिनने १९९९ मध्ये नेतृत्व करताना १८६ धावांची खेळी केली हाेती.

 

पुढील स्‍लाइडवर पा‍हा, रोहितची पत्नीला अॅनिव्हर्सरी गिफ्ट आणि धाेनीच्या पदस्पर्शाने चाहता सुखावला...

बातम्या आणखी आहेत...