A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: Illegal string offset 'level2_catname'

Filename: models/articles.php

Line Number: 34

Virat Kohli reach first place in ICC Test Rankings | द्विशतक ठोकून विराट कोहली ठरला टीम इंडियाला 7 वेळा विजय मिळवून देणारा पहिला कर्णधार
Virat Kohli reach first place in ICC Test Rankings

द्विशतक ठोकून विराट कोहली ठरला टीम इंडियाला 7 वेळा विजय मिळवून देणारा पहिला कर्णधार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 23, 2018, 07:42 PM IST

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या टेस्ट रॅंकिंगमध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे.

 • Virat Kohli reach first place in ICC Test Rankings

  क्रीडा डेस्क- टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या टेस्ट रॅंकिंगमध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. विराटने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याला पछाडले आहे. विराटने नॉटिंघम टेस्टनंतर आणखी एक विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. टेस्टमध्ये द्वीशतक ठोकून आपल्या संघाला 7 सामन्यात विजय मिळवून देणारा विराट हा जगातील पहिला कर्णधार ठरला आहे.

  कोहलीने ऑस्ट्रेलियाचा डॉन ब्रँडमॅन आणि रिकी पोटिंगला मागे टाकले आहे. ब्रँडमॅन आणि पोटिंगने टेस्टमध्ये नेतृत्त्व करताना 6 वेळा द्विशतक ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. महेंद्र सिंह धोनी याने एकदा द्विशतक ठोकून टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. धोनीने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 224 धावा केला होत्या.

  टेस्टमध्ये विराट कोहलीने ठोकल्या 200 पेक्षा जास्त धावा..

  धावा पहिला डाव दुसरा डाव कोणाविरुद्‍ध ठिकाण वर्ष
  200 200 - वेस्ट इंडीज एंटीगुआ 2016
  228 211 17 न्यूझीलंड इंदूर

  2016-17

  248 167 81 इंग्लंड विशाखापट्टनम 2016-17
  235 235 - इंग्लंड मुंबई 2016-17
  232 204 28 बांग्लादेश हैदराबाद

  2016-17

  213 213 - श्रीलंका नागपूर 2017-18
  200 97 103 इंग्लंड नॉटिंघम 2018

  आयसीसी टेस्ट रँकिंग

  पोजिशन फलंदाज रेटिंग
  1 विराट कोहली (भारत) 937
  2 स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) 929
  3 केन विलियम्सन (न्यूझीलंड) 847
  4 डेव्हीड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) 820
  5 जो रूट (इंग्लंड) 818

  आयसीसी वनडे रँकिंग

  पोजिशन फलंदाज रेटिंग
  1 विराट कोहली 911
  2 बाबर आझम (पाकिस्तान) 825
  3 जो रूट 818
  4 रोहित शर्मा 806
  5 डेव्हीड वॉर्नर 803

Trending