» IPL 2018 KKR Vs CSK Match Live Score And Updates From M A Chidambaram Stadium Chennai

रवींद्र जडेजाने मारला विजयी षटकार; चेन्नई सुपरकिंग्जचा केकेअारवर 5 गड्यांनी विजय

दोन्ही टीमांमध्ये 7 सामने खेळले गेले. ज्यातील 5 सामने चेन्नईने तर 2 कोलकाता टीमने जिंकले.

वृत्तसंस्था | Apr 11, 2018, 04:46 AM IST

चेन्नई - रवींद्र जडेजाच्या (नाबाद ११) विजयी षटकाराच्या बळावर चेन्नई सुपरकिंग्ज संघाने अापल्या घरच्या मैदानावर मंगळवारी ११ व्या सत्रातील इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत विजय संपादन केला. चेन्नईने दुसऱ्या सामन्यात दिनेश कार्तिकच्या काेलकाता नाइट रायडर्स संघावर ५ गड्यांनी राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासह चेन्नई संघाने लीगमधील अापली विजयी लय कायम ठेवली. चेन्नईचा लीगमधील हा सलग दुसरा राेमहर्षक विजय ठरला.


अांद्रे रसेलच्या (८८) नाबाद अर्धशतकाच्या बळावर काेलकात्याने प्रथम फलंदाजी करताना यजमान चेन्नईसमाेर विजयासाठी २०३ धावांचे खडतर लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात धाेनीच्या सुपरकिंग्जने घरच्या मैदानावर ५ गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले. या विजयामध्ये बिलिंग्जनेही (५६) माेलाचे याेगदान दिले. त्यामुळे चेन्नई टीमच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. तसेच कर्णधार महेंद्रसिंग धाेनीने २५, वाॅटसनने ४२ अाणि अंबाती रायडूने ३९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे टीमला अापली लय कायम ठेवता अाली.

सामनावीर सॅम बिलींग्सचे अर्धशतक
चेन्नई सुपरकिंग्ज टीमच्या सॅम बिलींग्सने घरच्या मैदानावर काेलकाता नाइट रायडर्सची सुमार गाेलंदाजी फाेडून काढली. त्याने २३ चेंडूंचा सामना करताना दाेन चाैकारासह ५ उत्तंुग षटकार ठाेकून ५६ धावांची खेळी केली. यासह त्याने अापल्या टीमचा विजय निश्चित केला. या तुफानी खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गाैरवण्यात अाले.

केकेअारच्या रसेलचे ११ उत्तुंग षटकार
काेलकाता संघाच्या अांद्रे रसेलने सामन्यात यजमान चेन्नईच्या सुमार गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. त्याने ३६ चेंडूंत नाबाद ८८ धावांची तुफानी खेळी केली. यामध्ये त्याने एका चाैकारासह ११ उत्तुंग षटकार ठाेकले. यासह त्याला टीमच्या धावसंख्येला गती देता अाली. त्याचे यंदाच्या सत्रातील लीगमध्ये हे पहिले अर्धशतक ठरले.

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

Next Article

Recommended