आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जयपूर- संजू सॅमसन (५२) अाणि गाेवथामच्या (नाबाद ३३) झंझावाती खेळीच्या बळावर राजस्थान राॅयल्स संघाने रविवारी ११ व्या सत्राच्या अायपीएलमध्ये शानदार विजयाची नाेंद केली. राजस्थान संघाने लीगमधील अापल्या सहाव्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पराभूत केले.
राजस्थानने ३ गड्यांनी सामना जिंकला. यासह राजस्थानने स्पर्धेत तिसरा विजय संपादन केला. दुसरीकडे राेहितच्या मुंबई इंडियन्सला चाैथ्या पराभवाचा सामना करावा लागला. सुमार खेळीमुळे मुंबईला अापली पराभवाची मालिका खंडित करता अाली नाही.
सूर्यकुमार यादव (७२) अाणि ईशान किशनच्या (५२) अर्धशतकाच्या अाधारे मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १६७ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात राजस्थान राॅयल्स संघाने ७ गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले. संघाकडून संजू सॅमसनसह (५२), स्टाेक्स (४०) अाणि गाेवथामने (नाबाद ३३) शानदार खेळी केली. त्यामुळे राजस्थानच्या टीमला शानदार विजयाची नाेंद करता अाली.
संजूचे दुसरे अर्धशतक : राजस्थान राॅयल्स संघाच्या फाॅर्मातील संजू सॅमसनने लीगमध्ये उल्लेखनीय खेळी करताना दुसरे अर्धशतक साजरे केले. त्याने रविवारी घरच्या मैदानावर मुंबईविरुद्ध ५२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने ३९ चेंडूंत ४ चाैकारांच्या अाधारे ही खेळी केली. यासह त्याला संघाच्या विजयाचा मजबूत पाया रचता अाला. त्याने बंगळरूविरुद्ध नाबाद ९२ धावा काढल्या हाेत्या.
सूर्यकुमारचे अर्धशतक व्यर्थ
मुंबई इंडियन्सकडून युवा फलंदाज सूर्यकुमार यादवने झंझावाती खेळी केली. त्याने सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले. त्याने ४७ चेंडूंचा सामना करताना ६ चाैकार अाणि ३ षटकारांच्या अाधारे ७२ धावांची खेळी केली. याशिवाय त्याने ईशान किशनसाेबत दुसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली. ईशान किशनने ५८ धावांचे माेलाचे याेगदान दिले.
गाेवथामने खेचून अाणली विजयश्री
पराभवाच्या सावटखाली असलेल्या राजस्थान राॅयल्स संघाकडून युवा फलंदाज गाेवथामने सुरेख फलंदाज केली. त्याने नाबाद ३३ धावांची खेळी करताना राजस्थान संघासाठी विजयश्री खेचून अाणली. त्याने ११ चेंडूंत ४ चाैकार अाणि २ षटकार खेचून मुंबईच्या विजयाचा प्रयत्न हाणुन पाडला.
हेही वाचा,
चेन्नईच्या किंग्जचा ‘सुपर’ विजय चेन्नई टीमचा 4 धावांनी विजय; चाहरचे तीन बळी
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.