आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL: बाेली न लागलेल्या गेलचे वादळी शतक; पंजाबचा हैदराबादवर 15 धावांनी विजय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माेहाली- विंडीजच्या ३८ वर्षीय क्रिस गेलने (नाबाद १०४)  गुरुवारी ११ व्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये स्फाेटक खेळी केली. या वादळी शतकाच्या बळावर किंग्ज इलेव्हन पंजाबने गुरुवारी घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबाद संघावर १५ धावांनी मात केली. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना हैदराबादसमाेर विजयासाठी १९४ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात हैदराबादला १७८ धावांपर्यंत मजल मारता अाली. यातून टीमचा पहिला पराभव झाला. 


यंदाच्या लिलाव प्रक्रियेमध्ये दुर्लक्षित झालेल्या या खेळाडूने पंजाब टीमकडून माेहालीच्या मैदानावर वादळी खेळी केली. त्याने  सनरायझर्स हैदराबादविरुद्ध  तुफानी फटकेबाजी करताना शानदार शतक झळकावले. त्याचे यंंदाच्या सत्रातील हे पहिले शतक ठरले. तसेच त्याने अायपीएलच्या अापल्या करिअरमध्ये सहाव्या शतकाची नाेंद केली. त्याचे हे सहावे विक्रमी शतक ठरले. त्याने ६३ चेंडूंचा सामना करताना नाबाद १०४ धावा काढल्या. यामध्ये एका चाैकारासह ११ षटकारांचा समावेश अाहे.  यासह त्याने दमदार पुनरागमन केले. यामुळे गेल हा यंदाच्या सत्रामध्ये शतक ठाेकणारा पहिला खेळाडू ठरला. अातापर्यंत झालेल्या सामन्यात एकाही फलंदाजाला धावांचा तिहेरी अाकडा पार करता अाला नाही. 

 

पुढील स्लाईडवर पहा,धाव फलक व आणखी माहिती......

 

बातम्या आणखी आहेत...