आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL: चेन्नईचा तिसऱ्या किताबाचा दावा; हैदराबादची जेतेपदाची संधी कायम; शार्दूलचे माेलाचे याेगदान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दाेन वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज संघाने मंगळवारी ११ व्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत धडक मारली. धडाकेबाज विजयाच्या बळावर चेन्नई संघाने अाता तिसरा किताबाचा दावाही मजबुत केला. 

 

सामनावीर फाफ डुप्लेसिसच्या (६७) नाबाद अर्धशतकाच्या अाधारे चेन्नई संघाने विलीयम्सनच्या सनरायजर्स हैदराबादवर २ विकेटने विजयाची नाेंद केली. या शानदार विजयाने चेन्नईला अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित करता अाला. दुसरीकडे पराभवामुळे हैदराबादचा फायनल गाठण्याचा प्रयत्न अपुरा ठरला. मात्र, अाता हैदराबाद संघाला अजुनही एक संधी अाहे. या संघाचा सामना अाता शुक्रवारी काेलकाता-राजस्थान यांच्यातील विजेत्या संघाशी हाेईल. 
हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना  ७ बाद १३९ धावा काढल्या.

 

प्रत्युत्तरात चेन्नई संघाने ८ गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले. फाफ डुप्लेसिसने एकाकी झुंज देत विजयश्री खेचून अाणली. या वेळी त्याला युवा फलंदाज शार्दूल ठाकूरने (नाबाद १५) माेलाचे याेगदान दिले. त्यामुळे चेन्नईला राेमहर्षक विजयाची नाेंद करता अाली. दरम्यान कर्णधार महेंद्र सिंग धाेनी (९), सुरेश रैना (२२), दीपक चाहर (१०) यांनीही चांगली खेळी केली.  त्यामुळे चेन्नईला राेखण्याचा हैदराबाद संघाचा प्रयत्न अपुरा ठरला. 


हैदराबादचा सलग चाैथा पराभव 
विलीयम्सनच्या सनरायझर्स हैदराबाद संघाला अाजही अापली पराभवाची मालिका खंडीत करता अाली नाही. हैदराबाद संघाचा यंदाच्या लीगमधील हा सलग चाैथा पराभव ठरला.

 

सामनावीर डुप्लेसिसचे नाबाद अर्धशतक
फाफ डुप्लेसिसने दाेन वेळच्या किताब विजेत्या चेन्नई सुपरकिंग्जला फायनलचे तिकीट मिळवून दिले. दरम्यान त्याने हैदराबादाची सुमार गाेलंदाजी फाेडून काढताना नाबाद अर्धशतकही साजरे केले. त्याने ४२ चेंडूंचा सामना करताना ५ चाैकार अाणि ४ षटकारांच्या अाधारे नाबाद ६७ धावांची खेळी केली.यासह त्याने चेन्नईसाठी विजयश्री खेचून अाणली. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...