आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्तिकने दिला काेहलीला धक्का; केकेअार विजयी; 4 गड्यांनी बंगळुरू संघावर केली मात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेलकाता- दिनेश कार्तिकच्या नव्या नेतृत्वाखाली काेलकाता नाइट रायडर्स संघाने रविवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये शानदार विजयाची नाेंद केली. यजमान काेलकात्याच्या टीमने  एेतिहासिक ईडन गार्डन मैदानावर विराट काेहलीच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. यजमान काेलकात्याने ४ गड्यांनी सामना जिंकला.


प्रथम फलंदाजी करताना बंगळुरू टीमने निर्धारित २० षटकांत ७ बाद १७६ धावा काढल्या. प्रत्युत्तरात काेलकात्याने ६ गडी गमावून  लक्ष्य गाठले. सुनील नरेन (५०), राणा (३४) व कर्णधार दिनेश कार्तिक (नाबाद ३५ ) यांनी तुफानी खेळी करताना टीमसाठी विजयश्री खेचून अाणली. बंगळुरूसाठी मॅक्लुमने ४३, काेहलीने ३१ व डिव्हिलियर्सने ४४ धावांची खेळी केली. 

बातम्या आणखी आहेत...