आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL: हैदराबादला दुसऱ्या किताबाची संधी; काेलकाता संघाची झुंज ठरली अपयशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेलकाता -  कर्णधार विलियम्सनच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबाद संघाने शुक्रवारी ११ व्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग (अायपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. युवा गाेलंदाज रशीद खान (३/१९), सिद्धार्थ काैल (२/३२) अाणि ब्रेेथवेट (२/१६) यांच्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर हैदराबाद संघाने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दाेन वेळच्या काेलकाता नाइट रायडर्स   संघाचा पराभव केला. हैदराबाद संघाने १३ धावांनी सामना जिंकला.

 

या धडाकेबाज विजयासह हैदराबादच्या संघाने दुसऱ्यांदा अायपीएलच्या किताबावर नाव काेरण्याचा दावा मजबूत केला. दुसऱ्यांदा फायनल गाठणाऱ्या हैदराबाद संघाचा मुकाबला अाता महेंद्रसिंग धाेनीच्या चेन्नई सुपरकिंग्जशी हाेईल. रविवारी मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा अंतिम सामना रंगणार अाहे. 


हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १७४ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात यजमान काेलकाता नाइट रायडर्स संघाला ९ गड्यांच्या माेबदल्यात अवघ्या १६० धावांपर्यंत मजल मारता अाली. संघाच्या विजयासाठी सलामीवीर लीनसह (४८), सुनील नरेन (२६) अाणि नितीश राणा (२२) यांनी एकाकी झंुज दिली. मात्र, त्यांना अापल्या टीमचा पराभव टाळता अाला नाही. तसेच शुबमान गिलने दिलेली झुंज अपयशी  ठरली. त्याने २० चेंडूंचा सामना करताना ३० धावा काढल्या. त्याने एकाकी झंुज देत विजयाच्या अाशा पल्लवित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ब्रेथवेटने त्याला बाद केले. 


युवा गाेलंदाजांनी माेडले कंबरडे 

विजयाच्या इराद्याने ईडन गार्डन मैदानावर उतरलेल्या काेलकाता संघाच्या दिग्गजांना फार का‌ळ अाव्हान कायम ठेवता अाले नाही. युवा गाेलंदाजांनी काेलकाता संघाचे कंबरडे माेडले. रशीद खानने ३ गडी बाद केले. तसेच ब्रेथवेट अाणि सिद्धार्थ काैलने प्रत्येकी दाेन विकेट घेतल्या.

 

सामनावीर रशीद खानच्या अष्टपैलू कामगिरीने हैदराबादला फायनलचे तिकीट

रशीद खानने अष्टपैलू कामगिरीच्या बळावर सनरायझर्स हैदराबाद संघाला फायनलचे तिकीट मिळवून दिले. त्याने फलंदाजी करताना १० चेंडूंमध्ये ३४ धावांची खेळी केली. यासह त्याने संघाच्या धावसंख्येला गती दिली. त्यानंतर धारदार गाेलंदाजी करताना तीन विकेट घेतल्या. यासह त्याने काेलकाता संघाच्या अनुभवी फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गाैरवले. 

 

रविवारी रंगणार फायनल
यंदाच्या ११ व्या सत्रातील अायपीएल ट्राॅफीसाठी अाता रविवारी फायनल रंगणार अाहे. मंुबईच्या वानखेडे स्टेडियमवर या अंतिम सामन्याचे अायाेजन करण्यात अाले. सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज अाणि सनरायझर्स हैदराबाद संघ समाेरासमाेर असतील. 

 

  पुढील स्लाईडवर पहा धावफलक.... 

बातम्या आणखी आहेत...