आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या पाकिस्तानी बॉलरला घाबरतो विराट, मुलाखतीमध्ये खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या नजरेत पाकिस्तानी बॉलर मोहम्मद आमिर त्या मोजक्या बॉलर्सपैकी एक आहे ज्यांचा सामना करणे त्याला कठिण जाते. नुकतेच एका टीव्ही शो मध्ये बॉलिवुडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत विराटने हा खुलासा केला. 
 
>> बॉलिवुड स्टार आमिर खानसोबत एका टीव्ही शोमध्ये चॅट करताना विराटला काही प्रश्न विचारण्यात आले होते. रविवारी हा कार्यक्रम टेलिकास्ट होणार आहे. त्यामध्येच कोणाच्या बॉलिंगवर खेळताना गंभीर होतो असा सवाल करण्यात आला होता. 
>> त्यास उत्तर देताना विराट म्हणाला, 'सध्याच्या बॉलर्सपैकी म्हटल्यास एक नाव सांगतो, तो म्हणजे पाकिस्तानी बॉलर मोहम्मद आमिर... तो जगातील टॉप 2 किंवा 3 बॉलर्सपैकी एक आहे. अशा बॉलर्सचा सामना करणे मला आपल्या करिअरमध्ये कठिण जाते.'
>> 'मोहम्मद आमिर त्या मोजक्या बॉलर्सपैकी एक आहे, ज्यांचा सामना करताना तुम्हाला आपला बेस्ट बॅटिंग फॉर्म दाखवावा लागतो. तो धडाकेबाज गोलंदाज आहे.'
>> यानंतर कोहलीने आमिरच्या बॉलिंगचे तोंडभर कौतुक केले. जेव्हा तो बॉलिंग करायचा त्यावेली देखील मी त्याचे कौतुक केले आहे असे विराट म्हणाला. 
>> विराटने गतवर्षी झालेल्या टी-20 वर्ल्‍डकपमध्ये भारत-पाकिस्तान सामना सुरू होण्यापूर्वी आमिरचे कौतुक केले होते. तसेच त्याला आपला बॅट देखील गिफ्ट म्हणून दिला.
>> विशेष म्हणजे, यावर्षी जूनमध्ये झालेल्या सामन्यात विराटची विकेट आमिरनेच घेतली होती. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, आमिरचा मॅच फिक्सिंग वाद आणि इतर FACTS...
बातम्या आणखी आहेत...