आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ वर्षांनतर धोनी खेळणार स्‍थानिक क्रिकेट, झारखंडकडे व्‍यक्‍त केली इच्‍छा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेंगलुरू - पुढच्‍या महिन्‍यात होणारी भारत विरुद्ध पाकिस्‍तान ही क्रिकेट मालिका रद्द झाली तर भारताच्‍या वन डे संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी आठ वर्षांनंतर झारखंडकडून विजय हजारे चषकात स्‍थानिक (देशातंर्गत क्रिकेट खेळू शकणार आहे.

या बाबत झारखंड राज्य क्रिकेट संघाचे (जेएससीए) सचिव राजेश वर्मा म्‍हणाले, ''धोनीने स्‍थानिक क्रिकेटमध्‍ये झारखंडकडून खेळण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली आहे. या संदर्भात धोनीसोबत बोलणे झाले असून, जर पाकिस्‍तान सीरिज रद्द झाली तर तो विजय हजारे चषकात खेळणार आहे. पण, तो नेमके किती सामने खेळणार किंवा झारखंड संघाचे नेतृत्‍व करणार ? यावर अजून चर्चा झाली नाही. परंतु, त्‍याची तर इच्‍छा असेल तर तो संघाचे नेतृत्‍व करू शकेल,'' अशी माहिती त्‍यांनी दिली.
2007 मध्‍ये खेळला शेवटचा समाना
वर्ष 2007 च्‍या विश्व कपमधून भारतीय संघ पहिल्‍याच फेरीत स्‍पर्धेतून बाद झाला. त्‍यावेळी धोनी झारखंडकडून कोलकाता विरुद्ध स्‍थानिक क्रिकेटमध्‍ये भाग घेतला होता. स्‍थानिक क्रिकेटचा हा त्‍याचा शेवटचा सामना होता. त्‍यावेळी त्‍याने सैयद मुश्ताक अली टी 20 चँपियनशिपमध्‍ये ही मॅच झाली होती.