आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकन क्रिकेटर करत होते प्रदूषणाचे गाऱ्हाणे, तेव्हा असा रिलॅक्स होता विराट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारत आणि श्रीलंकेत टेस्ट सिरीजचा तिसरा सामना दिल्लीत सुरू असताना श्रीलंकन खेळाडूंनी प्रदूषणाचे गाऱ्हाणे मांडले. त्यामुळे, तासाभरातच 4 ते 5 वेळा खेळ थांबवावा लागला. श्रीलंकन क्रिकेटर्स आपल्याला प्रदूषणाचा त्रास होत आहे अशी तक्रार करत होते. श्वास घेण्यास अडथळे येत असल्याचे सांगत त्यांनी तोंडावर मास्क देखील लावला होता. मॅच जेव्हाही थांबला तेव्हा श्रीलंकेचे प्लेअर्स तोंडाला पट्ट्या बांधून दिसत होते. मात्र, त्याच खेळाडूंसोबत ग्राऊंडवरच इंडियन टीमचा कॅप्टन विराट कोहली मस्त रिलॅक्स करत होता. जणू मैदानावर प्रदूषण नाही, असे तो दर्शवत होता.

 

विशेष म्हणजे, विराटने रविवारी दुहेरी शतक लावले होते. सामना सुरू राहिला असता तर विराटने तिहेरी शतकही ठोकले असते. त्याचे तिहेरी शतक मुद्दाम थांबवण्यासाठी श्रीलंकन टीमने प्रदूषणाचे गाऱ्हाणे मांडले अशी सोशल मीडियावर चर्चा आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, असा रिलॅक्स करत होता दिल्लीचा विराट कोहली...

बातम्या आणखी आहेत...