आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन अाेपन टेनिस: पेत्राेला धूळ चारत राफेल नदाल आता 16 व्या जेतेपदासाठी सज्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयाॅर्क- सातत्यपूर्ण उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर नंबर वनचे सिंहासन गाठणारा राफेल नदाल अाता करिअरमध्ये १६ वा ग्रँडस्लॅम किताब जिंकण्यासाठी उत्सुक अाहे. या जेतेपदापासून ताे अवघ्या एका पावलांवर अाहे. त्याने शुक्रवारी मध्यरात्री पुरुष एकेरीची फायनल गाठली. दुसरीकडे भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झाला महिला दुहेरीच्या उपांत्य सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. तसेच महिला एकेरीच्या किताबासाठी रविवारी मेडिसन कियास अाणि स्लाेएन स्टीफन्स झंुजणार अाहेत. यांच्यात महिला एकेरीची फायनल हाेईल.   
नंबर वन नदालने  उपांत्य सामन्यात अर्जेंटिनाच्या जुअान मार्टिन डेल पेत्राेचा पराभव केला. अाता पुरुष एकेरीच्या किताबासाठी स्पेनचा राफेल नदाल अाणि दक्षिण अाफ्रिकेचा केविन अँडरसन यांच्यात फायनल मुकाबला रंगणार अाहे.  
 
नदालची पेत्राेवर मात
अव्वल मानांकित राफेल नदालने अापली विजयी लय कायम ठेवताना उपांत्य सामना जिंकला. त्याने लढतीमध्ये २४ व्या मानांकित जुअान मार्टिन डेल पेत्राेचा पराभव केला. त्याने सामन्यात ४-६, ६-०, ६-३, ६-२ अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासह त्याने सामना जिंकून अंतिम फेरीतील अापला प्रवेश निश्चित केला.

सानियाचे स्वप्न भंगले 
भारताच्या सानिया मिर्झाचे महिला दुहेरीची फायनल गाठण्याचे स्वप्न भंगले. तिला अापली सहकारी शुअाई पेंगसाेबत महिला दुहेरीच्या उपांत्य सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. दुसऱ्या मानांकित यिहान चान-मार्टिन हिंगीसने रंगतदार सेमीफायनलमध्ये सानिया अाणि पेंगचा पराभव केला. त्यांनी ६-४, ६-४ ने  विजय संपादन केला. यासह त्यांनी अंतिम फेरी गाठली. या पराभवामुळे सानियाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. 

केविन अँडररसन फायनलमध्ये 
दक्षिण अाफ्रिकेच्या २८ व्या मानांकित केविन अँडरसनने पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली. त्याने अंतिम चारमध्ये १२ व्या मानांकित पाब्लाे कारेनाे बुस्टाचा पराभव केला. त्याने ४-६, ७-५, ६-३, ६-४ ने सामना जिंकला.

मेडिसन-स्टीफन्स झुंजणार
महिला एकेरीच्या किताबासाठी दाेन अमेरिकन टेनिसस्टार फायनलमध्ये झुंजणार अाहेत. यामध्ये स्लाेएन स्टीफन्स अाणि मेडिसन कियाचा समावेश अाहे. या दाेघींनीही सनसनाटी विजयाच्या बळावर महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली.
बातम्या आणखी आहेत...