आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-झिम्बाब्वेदरम्यान आज तिसरा एकदिवसीय सामना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिंक्य रहाणे - Divya Marathi
अजिंक्य रहाणे
हरारे - भारत आणि झिम्बाब्वेदरम्यान तिसरा एकदिवसीय सामना मंगळवारी खेळवला जाईल. यजमान झिम्बाब्वेवर ३-० ने क्लीन स्विपचे टीम इंडियाचे प्रयत्न असतील, असा िवश्वास भारताचा युवा कर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केला. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १२.३० वाजता सुरू होणार आहे. सामन्यात रायडू खेळणार नाही.

भारताने पहिला वनडे धावांनी, तर दुसरा वनडे ६२ धावांनी जिंकून मालिका विजय निश्चित केला. भारताने तिसरा सामनाही जिंकला तर आयसीसी वनडे क्रमवारीतील आपले दुसरे स्थान कायम राहील. भारत सध्या ११५ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे, तर ११ व्या स्थानी असलेल्या झिम्बाब्वेचे ४४ गुण आहेत. दोन्ही संघांच्या गुणांत तब्बल ७१ गुणांचे अंतर आहे.

चिगुम्बुरा,चिभाभाचे आव्हान
झिम्बाब्वेचेएल्टन चिगुम्बुरा आणि चिभाभाचे आव्हान भारतापुढे असेल. भारताविरुद्ध पहिल्या सामन्यात शतकी खेळी करणारा चिगुम्बुरा आणि दुसऱ्या सामन्यात ७२ धावांची खेळी करणारा चिभाभा भारतीय गोलंदाजांना त्रस्त करू शकतात. या दोघांपासून भारताला सतर्क राहावे लागेल. याशिवाय वुसी सिबांदा, हॅमिल्टन मसकदजा, सिकंदर राजा आणि ग्रीम क्रेमर यांच्याकडूनही चांगली कामगिरी होऊ शकते. झिम्बाब्वेकडून गोलंदाजीत डोनाल्ड तिरिपानो, नेविले मॅडझिवा, ब्रायन व्हिटोरी हे प्रमुख खेळाडू आहेत.

३००चा टप्पा केव्हा?
दहाप्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळत असलेल्या टीम इंडियाने पहिल्या दोन सामन्यांत २५० पेक्षा अधिक धावा निश्चित केल्या. मात्र, भारताला ३०० चा टप्पा ओलांडता आला नाही. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना वेगाने धावा काढण्याची गरज आहे. युवा खेळाडूंना रनरेट वाढवून मोठी खेळी करावी लागेल. मनोज तिवारी दोन सामन्यांत अपयशी ठरला. यामुळे या लढतीत मनीष पांडेला संधी मिळू शकते. गोलंदाजीत मोहित शर्मा आणि संदीप शर्मा यांनाही संधीची आशा असेल. धवलला बाहेर बसावे लागू शकते.
फलंदाजीवर लक्ष
नेतृत्वाबरोबर मी फलंदाजीवर लक्ष देत आहे. मोठी खेळी करण्याचे प्रयत्न असतील
- अजिंक्य रहाणे
असे असतील दोन्ही संघ
भारत :अजिंक्यरहाणे (कर्णधार), मुरली िवजय, मनोज तिवारी, रॉबिन उथप्पा, केदार जाधव, स्टुअर्ट बिन्नी, संजू सॅमसन, हरभजनसिंग, अक्षर पटेल, धवल कुलकर्णी, भुवनेश्वर कुमार , मनीष पांडे, संदीप शर्मा, मोहित शर्मा.
झिम्बाब्वे : एल्टनचिगुम्बुरा (कर्णधार), रेगिस चक्वाब्वा, चामू चिभाभा, ग्रिमी क्रिमर, नेविली मॅडझिवा, हॅमिल्टन मसकदजा, आर. मुतुम्बामी, सिकंदर राजा, प्रन्यांगरा, तिरिपानो, प्रॉस्पर उत्सया, व्हिटोरी, वॉलर, सीन विल्यम्स.
आमरे यांच्या प्रशिक्षण पद्धतीचा फायदा झाला : अजिंक्य रहाणे
माझे वैयक्तिक प्रशिक्षक भारताचे माजी कसोटीपटू प्रवीण आमरे यांच्या प्रशिक्षणाच्या अभिनव शैलीमुळे मी यशस्वी होऊ शकलो, असे मत झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने व्यक्त केले.

अजिंक्य म्हणाला, "आमरे सरांनी फुटबॉलमध्ये प्रचलित असलेल्या क्रिकेटसाठी पर्यायी आणि उपयुक्त ठरू शकणाऱ्या प्रशिक्षण पद्धती आणल्या. आम्हाला त्यामुळे वेगळ्या पद्धतीचे मार्गदर्शन झाले. फक्त तांत्रिक नव्हे, तर मानसिक सक्षमतेचेही प्रशिक्षण त्यांनी दिले. आमरे सर वेगवेगळ्या रंगांचे कोन वेगवेगळ्या क्षेत्ररक्षणाच्या ठिकाणी ठेवायचे. चेंडू स्वत: टाकून ते जो रंग सांगायचे तेथे मारावा लागायचा. सरावाने नंतर मी अधिक वेगात त्यांनी सांगितलेल्या रंगाच्या ठिकाणी चेंडू मारायला लागलो. प्रशिक्षणाचा फायदा झाला. मधल्या फळीत खेळताना मोकळ्या जागेत कसा चेंडू मारायचा याचा सराव त्यामुळे चांगलाच झाला,' असे अजिंक्यने म्हटले आहे.