आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका मुलाच्या आईवर फिदा होता कुंबळे, अशी आहे Love Story

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - भारताचा माजी क्रिकेट अनिल कुंबळे 17 ऑक्टोबर रोजी आपला 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. मॅरिड महिलांवर फिदा झालेल्या मोजक्या भारतीय क्रिकेटर्सपैकी तो एक आहे. चेतना हिला पहिल्या लग्नातून एक मुलगी आहे. मॅरिड आणि एका मुलीची आई असलेल्या चेतनाचा कुंबळेसोबतचा दुसरा विवाह हा प्रेमविवाह होता. 
 
 
अशी सुरू झाली लव स्टोरी...
- सुरुवातीला चेतना आणि तिचा उद्योजक पती कुमार व्ही जागीरदार सुखात जगत होते. मात्र, काही वर्षांत भांडणे वाढत गेल्याने ती आपल्या पतिला सोडून राहत होती. 
- याचवेळी तिने एका ट्रॅव्हेल एजंसीमध्ये काम सुरू केले. त्याच ठिकाणी तिची भेट अनिल कुंबळेशी झाली. 
- कुंबळेनेच पुढाकार घेत चेतनाशी मैत्री वाढवली. चेतनाच्या पास्टबद्दल कुंबळेला कळाल्यानंतर तो चेतनाच्या आणखी जवळ गेला आणि तिला मानसिक आधार दिला. 
- कुंबळेनेच तिला आपल्या पतीशी घटस्फोट घेण्यात सर्वच कायदेशीर मदत पुरवली. तसेच मुलगी आरुणी हिची कस्टडी सुद्धा मिळवून दिली. यानंतर दोघांना आपल्या आयुष्यात स्वीकारले.
- कुंबळे आणि चेतना यांनी 1 जुलै 1999 रोजी विवाह केला. आता या कपलला एकूणच दोन मुली आणि एक मुलगा आहे.
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या कपलचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...