आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashes 2015: England Thrashed By 405 Runs At Lord\'s As Australia Level Series With Huge Victory Inside Four Days

अॅशेस मालिका : कांगारूंचा इंग्लंडवर ४०५ धावांनी केली विक्रमी विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- अॅशेस मालिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्याच दिवशी पाहुण्या ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ४०५ धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला विजयासाठी ५०९ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडने अवघ्या १०३ धावांत गुडघे टेकले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-१ ने बरोबरी केली आहे.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ५६६, तर दुसऱ्या डावात २ बाद २५४ धावा काढल्या होत्या, तर इंग्लंडने ३१२ आणि १०३ धावा काढल्या. दुसऱ्या डावात इंग्लंडकडून तळाचा फलंदाज ब्रॉडने सर्वाधिक २५ धावा काढल्या. रुटने १७, कुकने ११, बॅलेंसने १४ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून जॉन्सनने २७ धावांत ३, तर हॅझलवूड, नॅथन लॉयन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

ऐतिहासिक सामना
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दोन्ही डाव मिळून १० गडी गमावून ८२० धावा काढल्या, तर इंग्लंडने २० गडी गमावत ४१५ धावा जोडल्या. सामन्याचे चारही दिवस ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवून इंग्लंडला घरच्या मैदानावर चारीमुंड्या चीत केले. स्मिथचे द्विशतक आणि रॉजर्सच्या शतकांनीही हा सामना गाजला.