आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिटायरमेंटनंतर हे काम करणार आशीष नेहरा, येथे जाणून घ्या...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - इंडियन टीमचा फास्ट बॉलर आशीष नेहराने 1 नोव्हेंबरला क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 20 वर्षे क्रिकेटमध्ये करिअर घडवणारा आशीष नेहरा यानंतरही क्रिकेटशी जुडलेला राहणार आहे. रिटायरमेंटनंतर नेहरा मागास भागातील मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण देणार आहे. याची सुरुवात तो जहीर खानसोबत बुंदेलखंड येथून करणार आहे. 
  
धोनीबाबत हे म्हणाला होता नेहरा
- यूपीच्या हमीरपूर जिल्ह्यातील राठ भागात विशाल सिंहने शाळेत क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आशीष नेहराच्या नावाने अकॅडमी सुरू केली आहे. 
- नेहराने जहीर खानसोबत मार्च 2017 मध्ये या अकॅडमीचे उद्घाटन केले होते. उद्घाटनानंतर तो कधीच येथे आला नाही. 
- उद्घाटनाच्या वेळी नेहराने म्हटले होते, की बुंदेलखंड खेळांच्या बाबतीत खूपच मागास आहे. येथे क्रीडासाठी आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध नाहीत. एमएस धोनी एका छोट्याशा गावातून निघून इंडियन क्रिकेट टीमचा कॅप्टन होऊ शकतो. मग, बुंदेलखंडचे युवक पुढे का जाऊ शकणार नाहीत.
- येथील मुलांमध्ये कौशल्याची काहीच कमतरता नाही. त्यांना केवळ व्यासपीठ मिळवून देण्याची गरज आहे. या अकॅडमीमध्ये अशाच टॅलेंटेड युवकांना घडवले जाणार आहे. 
- इंडस व्हॅली शाळेचे चेअरमन विशाल सिंह यांनी सांगितल्याप्रमाणे, ही क्रिकेट अकॅडमी नेहराच्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. येथील मुले नेहरा कधी येणार याचीच वाट पाहत आहेत. निवृत्तीनंतर नेहरा याच ठिकाणी आपले लक्ष केंद्रित करणार आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, उद्घाटनाच्या वेळी टिपलेले काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...