आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियाची वर्ल्डकपमधून माघार; बांगलादेश सुरक्षित नसल्याचे कारण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी- बांगलादेशात होणाऱ्या आयसीसीच्या अंडर १९ खेळाडंूच्या वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेतून ऑस्ट्रेलियाने मंगळवारी माघार घेतली. बांगलादेश खेळाडूंसाठी सुरक्षित नसल्याचे कारण सांगत ऑस्ट्रेलियाने ही घोषणा केली. मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरक्षेच्या कारणामुळे ऑस्ट्रेलियाने बांगलादेशातील आपला नियोजित कसोटी दौरा रद्द केला होता. १९ वर्षांखालील खेळाडूंच्या वर्ल्डकपला बांगलादेशात येत्या २७ जानेवारीपासून सुरुवात होत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या माघारीमुळे स्पर्धेची रंगत थोडी कमी झाली असली तरीही ही उणीव भरून काढण्यासाठी आयसीसीकडून आयर्लंड संघाला बोलावण्याचा विचार सुरू आहे. ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ संघाने ऑक्टोबरमध्ये सुरक्षेचे कारण सांगत बांगलादेशचा दौरा रद्द केला होता. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सुदरलँड म्हणाले, "खेळाडू आणि संघ व्यवस्थापनाची सुरक्षा याला आमची प्राथमिकता आहे.

अहवालानंतर निर्णय
सीएनेसमितीला सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी बांगलादेशात पाठवले होते. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षा विभागाचे प्रमुख सीन कॅरोल यांनी मागच्या आठवड्यात बांगलादेशातील सुरक्षा अहवाल सोपवला. त्यांच्या अहवालानंतर ऑस्ट्रेलियाने माघारचा निर्णय घेतला.
बातम्या आणखी आहेत...