आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australia Vs West Indies: David Warner Hits Century In Draw

सिडनी कसोटी: ड्रॉ सामन्यात डेव्हिड वॉर्नरचे नाबाद शतक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी- मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सिडनी कसोटीच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने नाबाद शतक ठोकले. सामन्यातील दोन दिवस पावसामुळे खेळ झाला नाही. पाचव्या दिवशी वेस्ट इंडीजने आपला पहिला डाव ७ बाद २४८ धावांवरून पुढे सुरू केला.

वेस्ट इंडीजने तीनशे धावांचा टप्पा ओलांडत ३३० धावा काढल्या. त्यांच्याकडून क्रेग ब्रेथवेटने ८५, कार्लोस ब्रेथवेटने ६२, तळाचे फलंदाज केमर रोचने १५, टेलरने १२ तर वाॅरिकनने नाबाद २१ धावा काढून तीनशेचा टप्पा गाठून दिला.त्यांचा डाव ३३० धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून किफे आणि नॅथन लॉयन यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या.

वॉर्नरने दिवस गाजवला : यानंतर ऑस्ट्रेलियाने ३८ षटकांत २ बाद १७६ धावा काढल्या. यजमान संघाकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने १०३ चेंडूंत वनडे स्टाइल फलंदाजी करताना नाबाद १२२ धावा काढल्या. वॉर्नरने या खेळीत २ षटकार आणि ११ चौकार ठोकून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्याने ११८.४४ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. जो. बर्न्सने २६, तर मिशेल मार्शने २१ धावा काढल्या. या दोघांनी वॉरिकनने बाद केले. पीटर नेव्हिल ७ धावांवर नाबाद राहिला. वॉर्नरने आक्रमक फलंदाजी करून वेगवान शतक ठोकले.