आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट काेहली अाक्रमक, सकारात्मक कर्णधार!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट काेहलीने कसाेटीमध्ये प्रभावीपणे अापल्या कर्णधारपदाच्या जबाबदारीला सुरुवात केली. बांगलादेशविरुद्ध कसाेटीत पाच गाेलंदाजांना खेळवण्याचा त्याचा निर्णय सकारात्मक ठरला. या कसाेटीत त्याची फलंदाजी अाक्रमक हाेती. मात्र, ही कसाेटी अनिर्णीत राहिली. यात काेहलीची कदाचितच काेणती चूक राहिली असेल. पावसामुळे अर्ध्यापेक्षा अधिक खेळ वाया गेला. याशिवाय भारताने बांगलादेशला फाॅलाेअाॅनसाठी भाग पाडले. मात्र, तरी कसाेटीच्या निकालाची काेणतीही अाशा नव्हती.

अाता काेहलीने मजबूत टीमविरुद्ध पाच गाेलंदाज खेळवले की नाही? हे अद्याप काेणालाही माहीत नाही. मात्र, त्याने कर्णधाराच्या पदार्पणात विजय मिळवण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरणार असल्याचे संकेत दिले. खरे तर, विराट काेहलीचे याेगदान हे कसाेटीनंतर जगजाहीर झाले. त्याने डीअारएसवर खुल्या मनाने विचार करण्यास भाग पाडले अाहे. हे स्वागतार्ह अाहे. कारण, अनेक वर्षांपासून बीसीसीअाय अापल्याच भूमिकेवर ठाम अाहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धाेनी अाणि टीमचे डायरेक्टर रवी शास्त्रीदेखील याच्याविरुद्ध अाहेत. अशात विराट काेहली अापले निर्णय स्वत:च घेत अाहे, असे म्हटल्या जाते. हे टीममधील सध्याच्या उत्साहपूर्ण वातावरणावरून दिसून येते. शेवटी ताे टीममधील वरिष्ठ खेळाडू अाहे. कर्णधाराच्या भूमिकेचा ताे अानंद लुटत अाहे. भारताने २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसाेटीदरम्यान डीअारएसचा प्रायाेगित तत्त्वावर वापर केला हाेता. मात्र, वरिष्ठ खेळाडूंच्या निराशेमुळे त्याला सुरुवातीपासून विराेध हाेत अाला. अातादेखील हा विराेध कायम अाहे. मात्र, इतर देशात याचा वापर केला जाता अाहे. यातून विचित्र परिस्थिती निर्माण झाली अाहे. एक अजून उदाहरण अाहे की, भारत जेव्हा विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध खेळताे, तेव्हा यात डीअारएस लागू असते. कारण, ही अायसीसीची स्पर्धा अाहे. जेव्हा हेच दाेन्ही संघ समाेरासमाेर असतात तेव्हा डीअारएसला परवानगी नसते. कारण याला भारतीय संघाचा विराेध असताे.