आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगला टायगर्सची डरकाळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - मागच्यानऊ महिन्यांत पाकिस्तान, भारताला धक्का देणाऱ्या बांगलादेशी टायगर्सने आता दक्षिण आफ्रिकेची शिकार केली आहे. रविवारी झालेल्या दुसऱ्या वनडेत बांगलादेशने आफ्रिकेला विकेटने हरवले. यासह यजमान संघाने मालिकेत १-१ ने बरोबरी केली.
बांगलादेशच्या विजयाचे हीरो मुस्ताफिजूर रहेमान (३/३८) आणि नासिर हुसेन (३/२६) तसेच सौम्य सरकार (नाबाद ८८) ठरले. बांगलादेशने शानदार गोलंदाजीच्या बळावर द. आफ्रिकेला अवघ्या १६२ धावांत गुंडाळले. यानंतर विजयासाठी आवश्यक असलेले लक्ष्य २७.४ षटकांत गाठले. यजमान संघाकडून सौम्य सरकारशिवाय मोहमुदुल्लाहने (५०) अर्धशतक ठोकले. सलामीवीर सौम्य सरकार "मॅन ऑफ मॅच'चा मानकरी ठरला. सुरुवातीला गोलंदाजी आणि नंतर फलंदाजीत यजमान संघाने वर्चस्व गाजवले.

क्रिकेट इतिहासात बांगलादेशने दुसऱ्यांदा आफ्रिकेला हरवले. यापूर्वी त्यांनी २००७ मध्ये वर्ल्डकपमध्ये आफ्रिकेला धक्का दिला होता.