आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेशचा ऐतिहासिक विजय; मालिका बरोबरीत, इंग्लंडवर १०८ धावांनी मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीरपूर- मालिकेत दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात पाहुण्या इंग्लंडला १६४ धावांत गुंडाळून यजमान बांगलादेशने ऐतिहासिक विजय मिळवला. या िवजयासह बांगलादेशने दोन कसोटी सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरीत सोडवली. इंग्लंडवर बांगलादेशचा हा पहिला कसोटी िवजय आहे. बांगलादेशने तिसऱ्याच दिवशी इंग्लंडला चारीमुंड्या चीत केले. बांगलादेशला याआधी अखेरचा कसोटी विजय नोव्हेंबर २०१४ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध मिळाला होता. युवा ऑफस्पिनर मेहंदी हसन मिराज सामन्याचा मानकरी ठरला. त्याने सामन्यात १२ गडी बाद केले. तोच मॅन ऑफ सिरीजचा मानकरीही ठरला. मेहंदी जगातला असा सहावा गोलंदाज ठरला, ज्याने करिअरच्या सुरुवातीच्या दोन कसोटीत तीन किंवा त्यापेक्षा अधिक वेळ पाच गडी बाद करण्याचा पराक्रम केला.

इंग्लंडसमोर चौथ्या डावात विजयासाठी २७३ धावांचे लक्ष्य होते. मात्र, मेहंदी हसन मिराज आणि सकीब-अल-हसनच्या फिरकीत इंग्लिश टीम चीत झाली. इंग्लंडचा दुसरा डाव ४५.३ षटकांत १६४ धावांत आटोपला. इंग्लंडकडून चौथ्या डावात कर्णधार अॅलेस्टर कुक (५९) आणि बेन डकेट (५६) यांनी विजयी सुरुवात केली. सलामीची जोडी फुटताच इंग्लंडचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. जो. रुट (१), गॅरी बॅलेंस (५), मोईन अली (०), बेयरस्ट्रो (३), आदिल रशीद (०) हे झटपट बाद झाले. बेन स्टोक्सने २५ धावा काढून झुंज दिली. इतरांनी केवळ हजेरी लावली.

संक्षिप्त धावफलक : बांगलादेश २२० आणि २९६. इंग्लंड : २४४ आणि १६४.

मेहंदीच्या विकेट
इंग्लंडने ४३ षटकांत १६१ धावांत विकेट गमावल्या होत्या. बांगलादेशला विजयासाठी एका विकेटची गरज होती. मेहंदीने स्टुअर्ट फिनला शून्यावर पायचित करून बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. इंग्लंडच्या फलंदाजांना दोनअंकी धावसंख्या सुद्धा गाठता आली नाही. चार फलंदाज शून्यावर बाद झाले. मेहंदी हसनने ७७ धावांत तर सकीबने ४९ धावांत गडी बाद केले.
बातम्या आणखी आहेत...