आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेशी वाघ फोडत आहेत डरकाळी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटच्या जगतात आता बांगलादेशचे नाव माेठ्या अादराने घेतले जात अाहे. घरच्या मैदानावर या टीमने अातापर्यंत वर्षभरात चार वनडे मालिका (विरुद्ध झिम्बाव्वे, पाकिस्तान, भारत अाणि दक्षिण अाफ्रिका) जिंकण्याचा पराक्रम केला अाहे. यादरम्यान या संघाने एकूण १४ पैकी १२ सामन्यांत विजय मिळवले.
अशाप्रकारची उल्लेखनीय कामगिरी अाशियातील टीम इंडियासह काेणत्याही संघाला अद्याप करता अाली नाही. बांगलादेश टीमची ही यशस्वी कामगिरी काैतुकास्पद अाहेे, कारण या टीमने वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारणाऱ्या भारत अाणि दक्षिण अाफ्रिका संघाला २-१ अशा अंतराने पराभूत करून मालिका जिंकली.
बांगलादेश संघाला ‘टायगर्स’च्या टाेपणनावाने अाेळखले जाते. अाता वास्तव्यात हे वाघ झेप घेऊ लागले अाहेत. अाता त्यांना नवखे म्हटले जाऊ शकत नाही. मागील वर्षभरात बांगलादेशच्या संघात हा विकासात्मक बदल घडून अाला अाहे. वर्षभरापूर्वी चंडिका हथुरासिंघेने टीमच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एका वर्षात टीममध्ये झपाट्याने बदल घडला. त्यांनी प्रतिस्पर्धींना हरवण्याची कला अात्मसात केली. हथुरासिंघे यांनी संघात युवा खेळाडूंना सामील केलेे. टीममध्ये वेगवान अाणि स्पिनरशिवाय विविध काेच, फिल्डिंग काेच, फिजियाेथेरेपिस्ट अाणि मनाेवैज्ञानिकची नियुक्ती करून काेचिंच स्टाफ पूर्ण केला अाहे. सर्वांनी जबाबदारी स्वीकारून टीममध्ये बदल घडवून आणला. संघात अात्मविश्वास, जाेश अाणि अाक्रमता निर्माण करण्यासाठी हथुरासिंघे यांनी माेठी मेहनत घेतली. अनुभवी सकीबचा अायपीएलमधील अनुभवही फायदेशीर ठरला. बांगलादेशच्या टीमला अाता केवळ ‘घर के शेर’असे म्हणता येणार नाही. कारण या टीमने २०१५ विश्वचषकात इंग्लंडला हरवून अंतिम अाठमधील स्थान निश्चित केले हाेते. गटात स्काॅटलंडविरुद्ध ३१८ धावांचे लक्ष्यदेखील बांगलादेश टीमने यशस्वीपणे गाठले हाेते.

ज्यु. खेळाडूंची सध्याची कामगिरी
साैम्या सरकार २२ वर्षे
(९०, ८८* विरुद्ध द. अाफ्रिका), (५४, ४०, ३४ विरुद्ध भारत), (१२७* विरुद्ध पाकिस्तान)
लिटन दास २० वर्षे
भारतविरुद्ध ३४, ४६ काढल्या, मात्र,देशांतर्गत क्रिकेटमध्ये वेगाने प्रगती साधली
ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकांनी बांगलादेशला सावरले
बांगलादेश संघातील बदलाला अाॅस्ट्रेलियन प्रशिक्षकांचे माेठे याेगदान लाभले अाहे. सध्याचे काेच हथुरासिंघे हे जरी श्रीलंकेचे असले तरीही त्यांनी अापले काेचिंग करिअर अाॅस्ट्रेलियात घडवले अाहे. त्यांनी न्यू साऊथ वेल्स अाणि सिडनी थंडर्सच्या प्रशिक्षकपदाची भूमिका बजावली अाहे.
डेव व्हाॅटमाेर (२००३-२००७) अाॅस्ट्रेलिया
जे. सिडन (२००७-२०११) अाॅस्ट्रेलिया
स्टुअर्ट लाॅ (२०११-२०१२) अाॅस्ट्रेलिया
शेन जर्गनसन (२०१३-१४) अाॅस्ट्रेलिया
चंडिका हथुरासिंघे (२०१४ ते अाजपर्यंत) अाॅस्ट्रेलियन नागरिक, मूळ श्रीलंकेचे.

१. बांगलादेश विजयी विरुद्ध झिम्बाब्वे ५-०
२. बांगलादेश विजयी विरुद्ध पाकिस्तान ३-०
३. बांगलादेश विजयी विरुद्ध भारत २-१
४. बांगलादेश विजयी विरुद्ध द. अाफ्रिका २-१

यांचे विशेष याेगदान
१. सकीब अल हसन (१५६ वनडे, ४३८२ धावा, ६ शतक, ३० अर्धशतके)
२. मुशर्रफ मुर्तुझा (१५७ वनडे, २०० विकेट)
३. तमीम इक्बाल (१५० वनडे, ४५८१ धावा, ६ शतक, ३१ अर्धशतक)
४. मुशफिकुर रहिम (१५५ वनडे, ३७६४ धावा, ३ शतक, २२ अर्धशतक), सोबत यष्टिरक्षणही.
बातम्या आणखी आहेत...